युगांनुसार साधना न करणारे, युद्धेे, त्रिगुण आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण !

युगांनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील त्रिगुणांच्या प्रमाणात पालट होत गेला. याचा व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवरील परिणाम मनुष्यावर होऊन त्याच्या कृती अन् विचार यांमध्ये पालट झाला. त्याचा परिणाम निसर्गावरही झाला. अशा प्रकारे मनुष्याच्या आचरणाचा परिणाम मानवी आणि नैसर्गिक अशा दोन्ही स्वरूपांच्या आपत्तींवर झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले

 

१. युगांनुसार साधना न करणारे आणि युद्धे यांचे प्रमाण

युग साधना न करणार्‍ऱ्यांचे प्रमाण (टक्के) युद्धाचे (मानवी आपत्तींचे) प्रमाण (टक्के)
१. सत्ययुग १० १०
२. त्रेतायुग ३० ३०
३. द्वापरयुग ५० ५०
४. कलियुग ९० ९०

 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना न करण्याचे दुष्परिणाम

साधना केल्यामुळे सत्त्व गुणाची वृद्धी होऊन रज-तम गुण न्यून होतात. साधना न केल्यामुळे सत्त्वगुण वाढण्याचा मार्ग बंद होतो. युगांनुसार साधना न करणार्‍या मनुष्यांचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे मनुष्यांतील सात्त्विकतेचे प्रमाणही न्यून होऊन त्यांच्यातील रज-तम यांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढले. त्यामुळे मानवी आपत्तीरूपी युद्धांचे प्रमाण वाढले आहे.

 

२. युगांनुसार सत्त्व, रज आणि तम या गुणांचे प्रमाण

युग सत्त्वगुणाचे प्रमाण (टक्के) रजोगुणाचे प्रमाण (टक्के) तमोगुणाचे प्रमाण (टक्के)
१. सत्ययुग ६० ३० १०
२. त्रेतायुग ५० ३५ १५
३. द्वापरयुग ४० ४० २०
४. कलियुग २० ४५ ३५

 

व्यक्तीतील रजोगुण आणि तमोगुण वाढल्यामुळे व्यक्ती आक्रमक बनणे

रजोगुणामुळे मनुष्याकडून कर्म घडते आणि तमोगुणामुळे व्यक्तीचा अहंकार वाढून तो स्वार्थी, संकुचित आणि हिंसक बनतो. रज आणि तम या गुणांच्या संयुक्तीकरणामुळे व्यक्तीतील स्वार्थ शिगेला पोचतो आणि तो आक्रमक बनतो. रज-तमप्रधान व्यक्ती स्वार्थी आणि संकुचित होण्यासह महत्त्वाकांक्षी अन् अहंकारी झाल्यामुळे ती सर्वांवर स्वत:चे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे तिच्यात विस्तारवादाची लालसा जागृत झाल्यामुळे ती नवनवीन प्रांत जिंकण्यासाठी आणि जगावर स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सतत युद्ध करू लागते.

 

३. युगांनुसार साधक, सर्वसामान्य व्यक्ती आणि दुष्प्रवृत्ती असणारे यांचे प्रमाण

युग साधकांचे प्रमाण (टक्के) सर्वसामान्य व्यक्तींचे प्रमाण (टक्के) दुष्प्रवृत्ती असणार्‍यांचे प्रमाण (टक्के)
१. सत्ययुग ७० २० १०
२. त्रेतायुग ५० ३० २०
३. द्वापरयुग ३० ४० ३०
४. कलियुग २० ३० ५०

युगांनुसार साधकांचे प्रमाण न्यून होऊन साधना न करणार्‍यांचे आणि दुष्प्रवृत्ती असणार्‍यांचे प्रमाण वाढत गेले. दुष्प्रवृत्तीच्या व्यक्ती अनाचारी आणि अत्याचारी असल्यामुळे युगांनुसार मनुष्यांमध्ये होणार्‍या युद्धांचे प्रमाणही वाढत गेले.

 

४. युग, त्रिगुणांतील प्रधान गुण आणि
ऋतुचक्राच्या प्रतिकूलतेचे (नैसर्गिक आपत्तींचे) प्रमाण

युग त्रिगुणांतील प्रधान गुण ऋतुचक्राच्या प्रतिकूलतेचे (नैसर्गिक आपत्तींचे) प्रमाण (टक्के)
१. सत्ययुग सत्व २०
२. त्रेतायुग सत्व रज ३०
३. द्वापरयुग रज सत्व ५०
४. कलियुग रज तम  ८०

 

५. मनुष्य आणि निसर्ग

५ अ. मनुष्याची कृती आणि विचार यांचा प्रभाव निसर्गावर पडणे

मनुष्याची कृती आणि विचार यांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होत असतो अन् वातावरणाचा परिणाम निसर्गावर होत असतो. अशा प्रकारे मनुष्य अप्रत्यक्षरित्या निसर्गावर प्रभाव पाडत असतो.

५ आ. धर्मचक्रावर आधारित असणारे ऋतुचक्र धर्माचरण
झाल्यास सुरळीत चालणे आणि अधर्माचरण वाढल्यास ऋतुचक्र बिघडणे

निसर्गाचे वर्तन मनुष्याच्या धर्माचरणावर अवलंबून असते. धर्मचक्रावर आधारित असणारे ऋतुचक्र धर्माचरण झाल्यास सुरळीत चालते आणि अधर्माचरण वाढल्यास ऋतुचक्र बिघडते. त्यामुळे जेव्हा मनुष्य साधना करत नाही, तेव्हा त्याच्यातील रज-तम गुणांचे प्रमाण वाढते. याचा परिणाम वातावरणावर होऊन वातावरणातील सात्त्विकता नष्ट होऊन वातावरणही रज-तमप्रधान बनते. त्यामुळे ऋतुचक्र बिघडते. मनुष्याने साधना करणे सोडून दिल्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे आणि ऋतुचक्र बिघडून सर्व ऋतु मनुष्याला प्रतिकूल झाले आहेत. कलियुगात मनुष्य रज-तमोगुणी झाल्यामुळे तो अधर्माचरण करत असल्यामुळे निसर्गाचा मनुष्यावर कोप होऊन निसर्ग मनुष्यासाठी प्रतिकूल बनलेला आहे. त्यामुळे कलियुगात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

यावरून मनुष्याने धर्माचरण आणि साधना करणे किती महत्त्वाचे आहे, हे सूत्र लक्षात येते. मानवी आणि नैसर्गिक आपत्ती न्यून करण्यासाठी मनुष्याने सातत्याने साधना आणि धर्माचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच पृथ्वी टिकू शकते आणि पृथ्वीवरील मानव खर्‍या अर्थाने सुखी होऊ शकतो.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment