अनुक्रमणिका
१. श्री दत्तगुरूंचा नामजप कसा करावा ?
नामजपातून देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होण्यासाठी त्या त्या नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते. यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप कसा करावा, हे समजून घेऊया.
‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा तारक नामजप करतांना श्री दत्तगुरूंचे रूप मनोमन डोळ्यांसमोर आणावे आणि तेच आपले पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी धावून येणार आहेत, असा भाव ठेवून नामजपातील प्रत्येक अक्षराचा भावपूर्ण उच्चार करावा.
याउलट मारक नामजप करतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ यांतील प्रत्येक अक्षर मारक स्वरात उच्चारावे. या वेळी देवतेच्या नामावर म्हणजे ‘दत्त’ या शब्दातील ‘द’ या अक्षरावर अधिक जोर द्यावा.
२. सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करावा ?
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित केला असून तो सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप यांद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. येथून पुढे काळानुसार आवश्यक असलेला हाच एक नामजप उपलब्ध असणार आहे.
श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.
अ. नामजप म्हणण्याची गती
मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याची जप म्हणण्याची गती असते. श्री गुरुदेव दत्त । हा नामजप मध्यम गतीचा आहे. ज्यांना जलद गतीने म्हणायचे आहे, त्यांनी जप म्हणण्याच्या पद्धतीने जप जलद गतीत म्हणावा; पण जप म्हणण्याची पद्धत मात्र पालटू नये. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, असा साधनेचा सिद्धांत असल्याने ज्या गतीने नामजप केल्यावर भाव अधिक प्रमाणात जागृत होतो, त्या गतीने नामजप करावा.
आ. दोन नामजपांमधील अंतर
‘एका नामजपानंतर तोच नामजप ऐकण्यापूर्वी मध्ये किती अंतर असावे ?’, याविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘व्यक्तीच्या प्रकृतीनुसार दोन जपांमधील अंतर अधिक-उणे होऊ शकते. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे हा नामजप म्हणतांना हे अंतर आपण पालटू शकतो.’ ध्वनीमुद्रित केलेल्या या नामजपात सर्वसाधारण अंतर ठेवण्यात आले आहे.
सनातन संस्थेमध्ये अशा प्रकारे सूक्ष्माकडे नेणारा अभ्यास करायला शिकवले जाते. त्यामुळेच अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची प्रगती जलद गतीने होते.
– कु. तेजल पात्रीकर, संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
“श्री गुरुदेव दत्त नामजप”
“ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ नामजप “
३. दत्ताचा नामजप केल्याने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होते
अ. संरक्षक-कवच निर्माण होणे
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.
आ. अतृप्त पूर्वजांना गती मिळणे
बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात. मायेत गुरफटलेले असल्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. (भूलोक आणि भुवर्लोक यांच्या मध्ये मृत्युलोक आहे.) त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्या त्रासाचे प्रमाण कमी होते. याविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचा, ‘अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !’
इ. शिवाची शक्ती मिळणे
दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.
४. दत्ताचा नामजप आणि अतृप्त पूर्वजांच्या त्रासांवर उपाययोजना
१. कोणत्याही तर्हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीतकमी १ ते २ घंटे (तास) किंवा तीन तास `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप नेहमीच करावा. एरव्ही प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.
२. मध्यम तर्हेचा त्रास असल्यास कुलदेवतेच्या जपाबरोबरच `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप कमीतकमी २ ते ४ घंटे तरी करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.
३. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी ४ ते ६ घंटे जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशासारखे विधी करावे. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.
chan
खुप छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद।
om Shree Gurudev Datta
Sanatan Chaitanyavaani aap aata download hot nahi. Dattacha naamjap audio file kuthe melu shakel ?
नमस्कार सिद्धेश जी,
सनातन चैतन्यवाणी वरील सर्व ऑडियो आता पुढील लिंक वर उपलब्ध आहेत. https://www.sanatan.org/mr/audio-gallery आपण अवश्य याचा लाभ घ्यावा.
आपली
सनातन संस्था