पुनर्नवा चूर्ण

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

शरिराला पुन्हा नवे बनण्यास साहाय्य करते; म्हणून यास ‘पुनर्नवा’ म्हणतात.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

शरिराला पुन्हा नवे बनण्यास साहाय्य करते; म्हणून यास ‘पुनर्नवा’ म्हणतात. हे थंड गुणधर्माचे असून कफ आणि पित्त दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
अ. बद्धकोष्ठता, मूतखडा, मूत्रवहन संस्थेचे विकार, तसेच मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी १ चमचा पुनर्नवा चूर्ण वाटीभर गरम पाण्यात मिसळून दोन्ही वेळा जेवणाच्या ३० मिनिटे पूर्वी घ्यावे. १ मास
आ. सूज दिवसातून ३ – ४ वेळा १ चमचा पुनर्नवा चूर्ण वाटीभर गरम पाण्यात मिसळून घ्यावे, तसेच पुनर्नवा चूर्ण पाण्यात मिसळून सुजेवर लेप लावावा. १ घंट्याने हा लेप कोमट पाण्याने धुऊन टाकावा. ७ दिवस

 

२. सूचना

अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

 

५. ओळख

‘पुनर्नवा ही वनस्पती पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला तण म्हणून उगवते. (वर छायाचित्र पहा.) येता-जाता अशी वनस्पती कुठे दिसल्यास ती मुळापासून उपटून आणून घरी तिची लागवड करावी. या वनस्पतीचे खोड तांबूस असते. हिला गुलाबीसर रंगाची बारीक फुले येतात. ही भूमीलगत पसरणारी वनस्पती आहे. हिचे मूळ खोल असते. त्यामुळे वनस्पती उपटत असतांना तिचे मूळ तुटणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 

६. औषधासाठी काय वापरतात ?

औषधासाठी मुळासकट संपूर्ण वनस्पती वापरतात.

६ अ. बद्धकोष्ठता

पुनर्नव्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होते.

६ आ. मूत्रवहन संस्थेचे विकार

पुनर्नव्याच्या रोपाचा फूटभर लांबीचा तुकडा कापून धुवून मिक्सरमध्ये वाटून रस काढावा. रस येण्यासाठी वाटतांना अर्धी वाटी पाणी घालावे. असा प्रत्येकी अर्धी वाटी रस सकाळी आणि सायंकाळी घेतल्यास मूत्रपिंडांची सूज उतरण्यास, तसेच लघवी स्वच्छ होण्यास साहाय्य होते. मूतखड्यासाठीही याप्रमाणेच रस घ्यावा. हा उपचार साधारण १ मास करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२२)

ताजी वनस्पती उपलब्ध नसल्यास त्याऐवजी याचा वापर करता येतो. वनस्पतीची लागवड आणि वापर करण्यापूर्वी ती वनस्पती पुनर्नवाच आहे ना, याची जाणकाराकडून निश्चिती करून घ्यावी. चुकीची वनस्पती वापरल्यास अपाय होऊ शकतो. येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषध घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

Leave a Comment