हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन हाच पर्यावरण रक्षणाचा उपाय

प्रतिवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. यामध्ये पर्यावरणाचा र्‍हास रोखण्याचा संदेश दिला जातो; पण असा दिवस साजरा करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार पर्यावरणप्रेमींनी करावा. खर्‍या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अधर्माचा पूर आणि पाण्याची टंचाई !

पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे, काही भागांमध्ये अतीवृष्टी होणे, या केवळ नैसर्गिक आपत्ती आहेत, अशा भ्रमात रहाण्याचे अज्ञान आपण दाखवू नये.

भावी आपत्काळातील संजीवनी : सनातनची ग्रंथमालिका !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.

दुष्काळ : महाराष्ट्रासमोरील एक भीषण आव्हान !

गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. मध्यंतरी शासनाने १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली २ वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली. या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्या प्रकारे उठला आहे.

वसुंधरेचा कर्दनकाळ ठरू पहाणारा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारा मानव !

वसुंधरेची म्हणजे आपल्या पृथ्वीची मानवाने कशी अपरिमित हानी केली ?, याविषयीचा एक माहितीपट पहाण्यात आला. वसुंधरेने आधार दिला; म्हणून आपण जगत आहोत आणि आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी स्थूलदेह धारण करून साधना करणे शक्य होत आहे. पूर्वी मानव सुसंस्कृत आणि निसर्गाशी अनुकूल असे आचरण करणारा होता. त्याने तिला वसुंधरा म्हटले. तिच्यावर प्रेम केले आणि कृतज्ञतेच्या भावाने वास … Read more