‘अधिवक्ता अधिवेशना’साठी आलेल्या बेंगळूरू, कर्नाटक येथील मान्यवर अधिवक्त्यांनी गोव्यातील रामनाथी आश्रम पाहिल्यावर दिलेले अभिप्राय

‘इतर ठिकाणांच्या तुलनेत आश्रमातील वातावरण अत्यंत वेगळे आहे. येथे शांतता आहे. येथे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असून कोणालाही ती अनुभवायला येईल. मी यापूर्वी २ वेळा आश्रमात आलो होतो. या वेळी ‘पूर्णवेळ साधना करणार्‍यांची संख्या वाढली आहे’, असे मला दिसले.

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले आणि दैवी गुण असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी सनातनच्या ९६ व्या संतपदी विराजमान !

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. शिल्पा बर्गे यांनी केले.

आपत्काळाचे भीषण स्वरूप

सध्या संपूर्ण विश्वात, तसेच भारतातही आपत्काळाने महाभयंकर रूप धारण केले आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे.

श्रीविष्णूच्या दिव्य देहावर असलेले ‘श्रीवत्स’ चिन्ह

‘महर्षि व्यासांनी श्रीमद्भागवतामध्ये लिहिले आहे, ‘वैकुंठामध्ये सर्वजण श्रीविष्णुसारखे दिसतात. केवळ एकच अशी गोष्ट की, जी केवळ श्रीविष्णूच्या देहावर आहे. ती म्हणजे ‘श्रीवत्स’ चिन्ह !

पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

बालपण, वैवाहिक जीवन इत्यादी जीवनाच्या विविध टप्प्यांना परिस्थिती कशीही असली, तरी त्या आदर्श साधिकेप्रमाणे प्रेमभावाने आणि प्रसंगी साक्षीभावाने वागल्या आहेत.

ईश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि विविध दैवी गुणांनी युक्त असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) संतपदी विराजमान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात, शांत, समाधानी वृत्ती आणि देवाच्या कृपेसाठी तळमळणार्‍या श्रीमती कुसुम जलतारे (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

प्रार्थनेची विविध उदाहरणे

शंकराचार्यांनी परमेश्‍वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) – ‘हे परमेश्‍वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’

सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर या आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक आणि स्तंभलेखक पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १७ मे या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी अधिवक्त्या रामतीर्थकर (श्रीमती) यांच्यासमवेत शुभराय महाराजांच्या वंशज श्रीमती शुभांगी बुवा याही उपस्थित होत्या.

सतत वात्सल्यभावात राहून तळमळीने सेवा करणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२० मे २०१९) या दिवशी मार्गदर्शन करतांना सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

गुजरातमधील ‘द्वारकाधीश’ मंदिर आणि द्वारकापीठ

श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या आधी समुद्रात द्वारका बुडवली. दुर्वास ॠषींच्या शापामुळे यदुकुळाचा नाश झाला. समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या भूभागाला नंतर द्वारकेचे स्थान प्राप्त झाले !