केरळमध्ये ऑनलाईन ‘श्रीराम जपयज्ञ’ भावपूर्ण वातावरणात पूर्ण

श्रीरामनवमीच्या पावन दिवशी ऑनलाईन ‘श्रीराम जपयज्ञ’ मल्याळम् भाषेत घेण्यात आला. याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी भावाचर्ना केली.

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

भारत कोविड-१९ च्या भयानक लाटेविरोधात लढाई लढत आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

गुढीपाडव्यानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेश, झारखंड अन् बिहार या राज्यांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवचने आणि सामूहिक नामजप आदी उपक्रम राबवण्यात आले.

श्री मारुतिरायांवरील दृढ श्रद्धेमुळे गावाचे गारांपासून रक्षण झाल्याची अनुभूती येणे

गाजरवाडीच्या शेजारच्या गावांमध्ये गारांचा पाऊस पडून द्राक्षबागांची हानी होणे; परंतु गाजरवाडी येथे गारा न पडणे.

जगात २० वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये कोरोना तिसर्‍या क्रमांकावर !

जगातील २१९ देशांत कोरोनाचा संसर्ग असून गेल्या १६ मासांत ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दशकांत नैसर्गिक आपत्तींत जेवढे एकूण बळी गेले, त्यापेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे समोर आले आहे.

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पार पडला ‘ऑनलाईन’ सोहळा !

गतवर्षीपासून कोरोनाचे संकट चालू झाल्यामुळे प्रत्येकच सण-उत्सव साजरे करण्यावर बंधने येत आहेत. असे असले तरी धर्मप्रेमींसाठी श्रीरामनवमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांच्या मनामनांत श्रीराम असल्याने या उत्सवास धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती अन् धमार्र्चरण यांची आवश्यकता समाजाला पटवून देत आहेत ! – देवी श्री विद्यानंद सरस्वती

राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जसे धर्माचरणाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे, त्यानुसार आम्हीही आपल्या वैदिक धर्माचा, यज्ञ अन् गायत्री मंत्र यांचा प्रसार करतो. आपण प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे हिंदु संस्कृती आणि धमार्र्चरण यांची आवश्यकता पटवून दिली आहे. सध्या समाजात धर्मप्रसाराची पुष्कळ आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कच्छ येथील देवी श्री विद्यानंद सरस्वती (आदिशक्ति गुरु माँ) यांनी केले.

भारत हिंदु राष्ट्र होणार ! – स्वामी आनंद स्वरूप, अध्यक्ष, शंकराचार्य परिषद

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेले ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याविषयीचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे ठाम मत झाले आहे की, भारत हिंदु राष्ट्र होणार आहे. आजही हिंदुत्वावर काम करणारे अनेक लोक स्वत:ला निधर्मी समजत आहेत. अशा वेळी समिती आणि संस्था यांच्या वतीने प्रदर्शन, संवाद, प्रवचन, सत्संग या माध्यमातून धर्मप्रचाराचे कार्य प्रभावीपणे चालू आहेे. या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे प्रतिपादन शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी येथे केले.

भारतात मे मासाच्या मध्यापासून प्रतिदिन ५ सहस्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो !

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ने तिच्या अभ्यासात भारतात कोरोनामुळे मे मासाच्या मध्यामध्ये प्रतिदिन ५ सहस्रांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अभ्यासात दुसर्‍या लाटेचा सामना करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे.

भयावह ‘विक्रम’ !

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात थैमान घालायला आरंभ केला आहे. हा संसर्ग भारताच्या कानाकोपर्‍यात ज्या गतीने पसरत आहे, तो असाच चालू राहिला, तर पुढील २ मासांत भारत अमेरिकेला मागे टाकेल की काय, असे चित्र आहे.