केरळमध्ये ऑनलाईन ‘श्रीराम जपयज्ञ’ भावपूर्ण वातावरणात पूर्ण

प्रतिकात्मक छायाचित्र

कोची (केरळ) – श्रीरामनवमीच्या पावन दिवशी ऑनलाईन ‘श्रीराम जपयज्ञ’ मल्याळम् भाषेत घेण्यात आला. याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी भावाचर्ना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालना कु. मेघना सिजू हिने केले. भावार्चनेनंतर सर्वांनी नामजप केला. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

अनुभूती

१. डॉ. वत्सला यांना त्यांच्या आज्ञाचक्राकडे चांगली संवेदना जाणवत होती.

२. श्री. कनकराज यांना हनुमानाचे दर्शन झाले.

३. सौ. सबिता यांना खूप कृतज्ञता वाटली की, जपयज्ञामध्ये भाग घेता आला. त्याचे मन एकाग्र होऊन जप झाला, असे त्यांनी सांगितले.

४. सौ. नीना यांना ‘त्या प्रत्यक्ष रामराज्यामध्ये आहेत’, असे वाटत होते.

५. सौ. सरोज यांना जपाच्या आधी शारीरिक त्रास होत होता. जप झाल्यावर तो पूर्णपणे न्यून झाला.

६. सौ. शशिकला यांना जप करतांना देवाचे दर्शन झाले.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment