सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग १
काही दिवसांनी आम्ही माहीम कोळीवाडा येथे समुद्रकिनारी असलेल्या एका जागेत रहायला आलो. तीही २ खोल्यांची जागा होती. त्या जागेत आम्ही ८ भावंडे आणि आई-वडील रहात होतो. या जागेत माझा दहावीचा (एस्.एस्.सी.चा) निकाला लागला. तेव्हा मी शाळेत पाचवा आलो होतो !
