साधकांनो, साधनेच्या प्रयत्नांमध्ये मागे मागे राहू नका, नाहीतर प्रगतीत मागे मागे रहाल !

काही साधक चुका होतील, या भीतीमुळे एखादी सेवा करण्यास किंवा एखाद्या सेवेचे दायित्व घेण्यास कचरतात. काही साधक मला हे जमणार नाही, असा चुकीचा ग्रह मनाशी बाळगतात; त्यामुळे क्षमता असूनही त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा करणे जमत नाही.

प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्रता आणि एकांत या शब्दार्थांच्या गुंफणीतून उलगडलेले साधनामय जीवनाचे रहस्य !

१५.११.२०१५ पासून प.पू. पांडे महाराज यांनी साधकांना शारीरिक व्याधींसाठी मंत्र देण्याची सेवा चालू केली. त्या वेळी त्यांना साधकांच्या शारीरिक व्याधी वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मानसिक जडणघडणीत साम्य असल्याचे आढळून आले.