रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांसाठी ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील साहित्य अर्पण करून धर्मकार्यात हातभार लावा !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

हिंदु धर्मियांची स्थिती गंभीर आहे, आमच्या श्रीमंत हिंदूंच्या आणि भोळ्याभाबड्या मुली ‘लव्ह जिहाद’ला सर्वाधिक बळी पडत आहेत. सर्वत्र देवतांचे विडंबन होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमचे सदैव सहकार्य राहील. आम्ही श्री स्वामीनारायण भगवान यांची भक्ती करणारे असलो, तरी प्रथम हिंदु आहोत आणि मग भगवान श्री स्वामीनारायणांचे भक्त आहोत. एक हिंदु म्हणून आम्हाला हिंदु धर्म रक्षणाचे कार्य केलेच पाहिजे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांनी येथे केले.

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये प्रतिदिन वापरण्यासाठी ‘टूथपेस्ट’ची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक रहातात. भारतभरातील सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी पुढील वर्णनाप्रमाणे एकूण ५००० टूथपेस्टची आवश्यकता आहे.

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

देशात गेल्या वर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीकडून (एन्.सी.एस्.कडून) ही आकडेवारी देण्यात आली आहे

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

जगभरात गेल्या १२ घंट्यांमध्ये ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिक्टर स्केल इतका तीव्र होता.

कोरोनापेक्षाही अधिक धोकायदायक ‘कॅण्डीडा ऑरिस’ बुरशीची साथ येऊ शकते ! – वैज्ञानिकांची चेतावणी

जगात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला नसतांना आता कोरोना विषाणूप्रमाणेच एका बुरशीची जागतिक स्तरावर मोठी साथ येऊ शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘कॅण्डीडा ऑरिस’ असे या बुरशीचे नाव असून ही मानवासाठी अत्यंत घातक आहे.

हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू, ओळखीच्या संतांचा आश्रम उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

११ मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व आहे. या काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील १०० हून साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने आणि विविध सेवांसाठी हरिद्वारमध्ये वास्तूची तसेच वापरात नसलेली; परंतु सुस्थितीत असलेले आश्रमाची वास्तू यांची आवश्यकता आहे.