हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू, ओळखीच्या संतांचा आश्रम उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

११ मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व आहे. या काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील १०० हून साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने, तसेच विविध सेवांसाठी हरिद्वारमध्ये वास्तूची (घर, सदनिका (फ्लॅट), सभागृह (हॉल), वापरात नसलेली; परंतु सुस्थितीत असलेले आश्रमाची वास्तू यांची आवश्यकता आहे.

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता हरिद्वारमधील स्वतःची वास्तू, तसेच ओळखीच्या संतांचा आश्रम विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे. हरिद्वारमधील चंडीघाट, संन्यास रोड, ज्यालापूर, कनखल, सप्तर्षि मार्ग, हरकी पौडी या भागात ही वास्तू असल्यास सुलभ होईल; परंतु या व्यतिरिक्त शहराच्या अन्य भागांमधील वास्तूही चालू शकेल.

नाव आणि संपर्क क्रमांक : श्री. श्रीराम लुकतुके  – ७०१२०८५१८४

Leave a Comment