उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘हिंदूंचे धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हिंदु धर्मावरील हे आघात थांबवणे आवश्यक आहे.

श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे) १३६ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा असणाऱ्या सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुलभा मालखरेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातन संस्थेच्या १३६ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या.

देहलीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सोमनाथ येथील प्राचीन शिवलिंगाच्या अवशेषांचे दर्शन होणार !

वेदकुलपती जी.के. सीतारामन्जी यांनी महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारले असून ते पवित्र सोमनाथ शिवलिंगाचे अवशेषही महोत्सवासाठी आणणार आहेत.

देहली येथे डिसेंबर मासात होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना निमंत्रण !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी देहली येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले.

अकोला येथे सनातन संस्थेच्या वतीने प.प. श्री अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी महाराजांचा सन्मान !

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त अकोल्यातील मुकुंद मंदिर, रामदास पेठ येथे श्री दत्त उपासना मंडळ यांच्या वतीने ‘एक दीप सनातन हिंदु धर्म रक्षणार्थ’ हा भव्य दीपोत्सव पार पडला. या कार्यक्रमात सनातन धर्म तथा गौमाता रक्षक प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्री अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज (जगद्गुरु शंकराचार्य, संकेश्वर पीठ, करवीर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

देहली येथे डिसेंबर मासात होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना निमंत्रण !

सनातन संस्थेच्या वतीने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना नुकतेच निमंत्रण देण्यात आले.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : दिल्लीमध्ये होणार ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद!

‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि ‘सनातन संस्थे’च्या आयोजनात ‘शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ (इंद्रप्रस्थ) येथे आयोजित केला जात आहे.

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी सर्व साधकांनी प्रतिदिन १०८ वेळा ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा महामंत्र म्हणावा !

सध्या साधक करत असलेल्या नियमितच्या नामजपांसह यापुढे वरील महामंत्र प्रतिदिन १०८ वेळा म्हणावा.

दीपावलीनिमित्त आपले नातेवाईक, परिचित, तसेच आस्थापनातील कर्मचारी आदींना सनातनचे ग्रंथ भेट स्वरूपात देऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !

व्यवसाय करणारे हितचिंतक आपल्या सहकार्‍यांना, तसेच आस्थापनातील कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त भेट स्वरूपात ग्रंथ आणि लघुग्रंथ देऊन त्या माध्यमातून राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभागी होऊ शकतात.

केरळमधील श्री कुरुंबा भगवती मंदिराचे मुख्य पुजारी अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

केरळमधील प्रसिद्ध कोडुंगल्लूर श्री कुरुंबा भगवती मंदिराचे मुख्य पुजारी अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.