Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रकाशन !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी का जीवनचरित्र’ या सनातन संस्था निर्मित इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन करताना मान्यवर आणि संत

भारत मंडपम, देहली – १४ डिसेंबर या दिवशी महोत्सवात झालेल्या पहिल्या उद्बोधन सत्रामध्ये प्रारंभी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या सनातन संस्थेच्या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ, विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोककुमार, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. उदय माहूरकर, ‘सुदर्शन न्यूज नेटवर्क’चे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस व्यासपिठावर उपस्थित होते.

प्रारंभी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोककुमार यांचा सत्कार केला. हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय करून दिला.

‘सनातन राष्ट्र : चुनौतियां एवं चिंतन’ या सनातन संस्थेच्या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन

‘सनातन राष्ट्र : चुनौतियां एवं चिंतन’ या सनातन संस्था निर्मित हिंदी ग्रंथाचे प्रकाशन करताना मान्यवर आणि संत

Leave a Comment