फरिदाबाद (हरियाणा) येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या वेळी शिवाच्या उपासनेचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, शास्त्राप्रमाणे शिवाचे पूजन कसे करावे ?, ‘ॐ नम: शिवाय ।’ नामजप करण्याचे लाभ, तसेच कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ? यांविषयी माहिती दिली.

फरिदाबाद (हरियाणा) येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

फरिदाबाद (हरियाणा) महाशिवरात्रीच्या निमित्ताने २२ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या पूनम अरोडा यांनी येथील पिंपलेश्वर मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांना शिव उपासनेविषयी मार्गदर्शन केले.

आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी महिलांनी आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक ! – वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले

महिला हे शक्तीचे रूप आहे; पण त्याची जाणीव आजच्या महिलांना करून देणे आवश्यक आहे. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच अनेकांनी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयीची माहिती जाणून घेतली.

महाशिवरात्रीनिमित्त मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद

सनातन संस्थेच्या वतीने शिवाशा इस्टेट कॉलनीतील शिवाशेस्वर महादेव मंदिर आणि गर्तेश्वर महादेव मंदिर या दोन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विदर्भस्तरीय २ दिवसांचे साधनावृद्धी शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले !

‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना ही साधनेची दोन अंगे आहेत. ती एकमेकांवर अवलंबून आहेत. व्यष्टी साधना हा साधनेचा पाया आहे. जर व्यष्टी साधना अल्प असेल, तर त्याचा साधनेवर परिणाम होतो.

नांदेड येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी !

नांदेड येथील विष्णुपुरी गावातील श्री काळेश्वर महादेव मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाचा नामजप, तसेच धर्माचरण करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या ! – सौ. आशा साठे, सनातन संस्था

महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असते, तरी या दिवशी शिवाचा नामजप करणे, तसेच धर्माचरण करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. आशा साठे यांनी केले.

मुंबई आणि नवी मुंबई येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ४१ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई येथे एकूण ४१ ठिकाणी शिवमंदिरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात आणि कर्नाटक येथे ३४ ठिकाणी विविध शहरांत, ग्रामीण पातळीवर ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांचा सक्रीय सहभाग होता, प्रत्येक प्रदर्शनस्थळी मान्यवरांनी भेटी दिल्या.