स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

हरिदासपूर येथील स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती (वय ११२ वर्षे)
यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला शुभाशीर्वाद !

 
स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती (उजवीकडे) यांची भेट घेतांना डॉ. भूपेश शर्मा

फरीदाबाद – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी उत्तरप्रदेशमधील हरिदासपूर येथील स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती (वय ११२ वर्षे) यांची फरीदाबादच्या खेडी कला गाव येथे भेट घेतली. या वेळी त्यांना संस्था आणि समिती यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली, तसेच हिंदी भाषेतील सनातन पंचांग आणि हिंदी मासिक सनातन प्रभात भेट स्वरूपात देण्यात आले. या वेळी संस्था आणि समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद देतांना स्वामी म्हणाले, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ आदी सर्व सूत्रांना सोबत घेऊन सनातन संस्थेचे कार्य चालू आहे. या प्रसंगी खेडी कला गावातील श्री. आझाद नर्वत हेही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’