देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

pu_gajanan_kulkarni
दत्त अनुसंधानात असतांना पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी उपाख्य छोटे काका महाराज

परिचय 

पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी उपाख्य छोटे काका महाराज यांना नरसिंह सरस्वती यांचा अनुग्रह घेतलेले त्यांचे मोठे भाऊ पू. केशव गुरुनाथ कुलकर्णी हे गुरु म्हणून लाभले. त्यांच्या आज्ञेवरुन वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडून दत्त सेवा करण्यास आरंभ केला. वर्ष १९७४ ला ते श्रीक्षेत्र बांगरला आले आणि वर्ष १९७५ ला त्यांनी नोकरीचा त्याग करुन पूर्णकालीन दत्तभक्ती आरंभ केली. सध्या ते दत्तपादुका मंदिर श्रीक्षेत्र बांगर येथील मुख्य व्यवस्थापक म्हणून सेवा करत आहेत. महाराज सतत दत्ताच्या अनुसंधानात असतात.

उज्जैन, १ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी (छोटे काका महाराज) यांची नुकतीच भेट घेतली. पू. महाराज यांच्या श्रीक्षेत्र बांगर (देवास) येथील दत्तमंदिरात उभय संतांची भेट झाली. त्या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महाराजांंना समितीसमवेत सनातन संस्थेच्या कार्याचीही माहिती दिली. तेव्हा महाराजांनी संस्थेचे कार्य चांगले असल्याचे सांगून या कार्याला शुभाशीर्वाद दिले, तसेच दत्तजयंती निमित्त त्यांच्या मंदिरात सनातन-निर्मित ग्रंथप्रदर्शन अन् फलकप्रदर्शन लावण्याची अनुमती दिली. या प्रसंगी समितीचे श्री. योगेश व्हनमारे उपस्थित होते. या प्रदर्शनास महाराजांचे चिरंजीव श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली.

क्षणचित्र

उज्जैन येथे वर्ष २००४ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभपर्वात सनातन संस्थेच्या वतीने श्रीक्षेत्र बांगर येथे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. तेव्हा पू. गजानन कुलकर्णी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी माहिती जाणून घेतली होती. त्या आठवणींना उजाळा देत पू. गजानन कुलकर्णी यांनी या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची आस्थेने विचारपूस केली.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’