घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सहज करता येण्याजोगी भाजीपाल्याची लागवड

Article also available in :

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी मयूरेश कोनेकर

‘घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी काहीही विकत आणावे लागत नाही. तेलाचे रिकामे डबे, जुने टब किंवा प्लास्टिकची जुनी भांडी, रंगाच्या बालद्या, धान्याच्या गोण्या, जुने टायर, अगदीच काही मिळाले नाही, तर भोक पाडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या यांमध्ये भाजीपाल्याची लागवड सहज करता येते. शहरात माती मिळत नसेल, तर तीही पुढील पद्धतीने बनवू शकतो. नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, तसेच घरातील ओला कचरा एकत्र करून पसरून ठेवल्यास साधारण २ मासांनी त्यापासून सुपीक माती (ह्यूमस) बनते. मेथीचे दाणे, मोहरी, धने, चणे, चवळी इत्यादी सर्वांकडे घरी उपलब्ध असतात. हे बियाणे म्हणून वापरता येते. पेठेतून आणलेल्या पालक किंवा पुदीना यांच्या जुडीत काही वेळा मुळांसकट काड्या असतात, त्या मातीत खोचल्यास त्यांच्यापासून पुन्हा रोपे येतात. कोंब फुटलेले आले, कांदा, बटाटा, रताळे, सूरण, अळकुडी (अळूचा कंद) यांपासूनही नवीन लागवड करणे सहज शक्य आहे.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा.

Leave a Comment