भाषाशुद्धीची चळवळ !

  

ईश्वरापासून दूर नेणार्‍या इंग्रजी भाषेपासून दूर रहा !

अ. ‘इंग्रजी भाषेत केवळ विज्ञान आहे. ते मायेचा शोध घेते आणि विविध सुखदायक शोधांनी मानवाला ईश्वरापासून दूर नेते.

आ. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी इंग्रजी भाषेत केवळ अर्थ आणि काम यांचा विचार केलेला आहे. धर्म आणि मोक्ष या सर्वांत महत्त्वाच्या पुरुषार्थांचा विचारही केलेला नाही !’

डॉ. जयंत आठवले (संकलक) (१९.१.२००७)

 

‘हॅलो’ या शब्दाचे उच्चारण केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

‘नमस्कार’ या शब्दाचे उच्चारण केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

सनातन संस्थेची भाषाशुद्धीची चळवळ

महाराष्ट्रदिन, १.५.२००८ पासून सनातन संस्थेने भाषाशुद्धीची चळवळ आरंभ केली आहे. तिच्यात व्यक्तीगत स्तरावरील प्रयत्न आणि जनजागृती असे दोन्ही भाग आहेत. या चळवळीला ‘दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभात’ यांमधून व्यापक प्रसिद्धी देण्यात येत आहे.

 

सनातनच्या भाषेसंबंधीच्या कार्याचे वैशिष्ट्य

स्वा. सावरकर, माधवराव पटवर्धन यांसारख्यांनी ‘भाषाशुद्धी’पेक्षा ‘शब्दशुद्धी’ केली, असे म्हणावे लागेल. त्यांचे ते कार्य उल्लेखनीयच आहे. आता मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांवरील ग्रंथमालिकाच प्रकाशित करून त्यांतून सूक्ष्म स्तरावरचा भागही उलगडून दाखवून सनातनने खरोखरच ‘भाषाशुद्धी’ही आरंभलेली आहे. सनातननिर्मित हे ग्रंथ ईश्वरी राज्याचा शैक्षणिक, सामाजिक, प्रशासनिक आणि धार्मिक पाया अधिक भक्कम करतील !

सनातन-निर्मित भाषाविषयक ग्रंथमालिकेविषयीची माहिती वाचण्यासाठी पुढील विषय पहा – भारतीय भाषांच्या दु:स्थितीवर उपाययोजना सांगणारी ग्रंथमालिका

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘भाषाशुद्धीचे व्रत’

Leave a Comment