‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथील संत वेणास्वामी मठाची स्वच्छता !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त . . .

मिरज – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गत मिरज येथील प्रसिद्ध संत वेणास्वामी मठाची स्वच्छता करण्यात आली.

 

मिरज येथे संत वेणास्वामी मठाची स्वच्छता करतांना सनातन संस्थेच्या साधिका

मठाची स्वच्छता केल्यावर मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी समाधान व्यक्त केले.

कुपवाड येथे शिवमंदिराची स्वच्छता करतांना सनातन संस्थेच्या साधिका
कुपवाड येथे शिवमंदिरात साकडे घालतांना सनातन संस्थेचे साधक आणि भाविक

याचप्रकारे कुपवाड येथील शिवमंदिर येथे स्वच्छता करून तेथे साकडे घालण्यात आले. या उपक्रमानंतर मंदिर विश्वस्त श्री. राजेंद्र माळी यांनी ‘सनातन संस्थेचे सर्वच उपक्रम राष्ट्र आणि धर्म उपयोगी असतात’, असे सांगून मंदिरात कोणतेही उपक्रम घेण्यास सहकार्य करू असे सांगितले. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक, भाविक उपस्थित होते.

Leave a Comment