आनंदी आणि श्रीविठ्ठलाविषयी भोळाभाव असणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका भावसोहळ्यामध्ये झाली आनंददायी घोषणा !

रामनाथी, गोवा – आनंदी, हसतमुख आणि भोळ्या भावाने श्रीविठ्ठलभक्तीत रममाण झालेले ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले. १४ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका भावसोहळ्यामध्ये ही आनंददायी घोषणा करण्यात आली. या मंगलप्रसंगी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. पृथ्वीराज हजारे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. तसेच पू. राजाराम भाऊ नरुटे यांचे कुटुंबीय अन् सनातनचे काही साधकही या वेळी उपस्थित होते. पू. राजाराम भाऊ नरुटेकाका हे सनातनचे पूर्णवेळ साधक श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचे वडील आहेत. (सविस्तर बातमी लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

Leave a Comment