सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले ! – श्री. महेश काळे

श्री. महेश काळे आणि त्यांचे भाऊ श्री. मंदार काळे, कार्याची माहिती श्री. अमोल हंबर्डे

रामनाथी – सुप्रसिद्ध शास्त्रीय आणि सुगम गायक श्री. महेश काळे आणि त्यांचे भाऊ श्री. मंदार काळे यांनी १७ डिसेंबर या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिली. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात केल्या जाणार्‍या संशोधन कार्याची ओळख ‘स्पिरिच्युअल रिसर्च फाउंडेशन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाचे संपादक ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शॉन क्लार्क यांनी करून दिली. श्री. महेश आणि श्री. मंदार काळे यांना आश्रमातील ध्यानमंदिर, कलेशी संबंधित कार्य आणि ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकांचे कार्य यांविषयीची माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर अन् श्री. अमोल हंबर्डे यांनी दिली. या वेळी श्री. महेश काळे यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले’, असे सांगितले.

 

माझ्या सदिच्छा आणि भगवंताचे आशीर्वाद
नेहमी तुमच्या कार्याला आहेत ! – श्री. महेश काळे

गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना नेहमी यश मिळते. तुम्ही केलेले संशोधन आणि शोधकार्य आम्हाला सांगितले, यासाठी धन्यवाद ! माझ्या सदिच्छा आणि भगवंताचे आशीर्वाद नेहमी तुमच्या कार्याला आहेत.

‘आश्रमात प्रवेश केल्यापासूनच येथील वातावरणात सकारात्मक ऊर्जा अनुभवली. या सकारात्मक ऊर्जेचा सर्वांनाच लाभ होऊ दे ! – श्री. मंदार काळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment