‘योग’ या संकल्पनेला आध्यात्मिक पाया ! – वासंती लावंघरे, सनातन संस्था

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सनातनच्या साधिका श्रीमती वासंती लावंघरे (उभ्या असलेल्या) आणि श्री. दामले सर (खुर्चीवर बसलेले)

सातारा – भारतीयांसह विश्वातील सर्वच मानवजातीने योगाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे; कारण योग या संकल्पनेला आध्यात्मिक पाया असून विदेशातील अनेक तज्ञांनी तो आत्मसात केल्याचे आपल्याला पहायला मिळते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या श्रीमती वासंती लावंघरे यांनी केले.

‘स्नेहमंच’च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ‘निरोगी आयुष्यासाठी योगसाधना ही काळाची गरज’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक अविनाश दामले, श्री. पवार, श्री. दामले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा लाभ २० योगसाधकांनी घेतला.

श्रीमती वासंती लावंघरे पुढे म्हणाल्या, २१ जून हा ‘जागतिक योगदिन’ म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. वास्तविक योगासने हा दैनंदिन उपक्रम झाला पाहिजे; परंतु २१ जून या दिवशी हा केवळ उपक्रम म्हणून किंवा ‘इव्हेंट’ म्हणून साजरा केला जातो. सहस्रो रुपये भरून ‘जिम’ला जाणार्‍या मनुष्याने धर्मशास्त्रयुक्त योगविद्येचा पर्याय स्वीकारल्यास या धकाधकीच्या जीवनात त्यांना आरोग्याची धनसंपदा नक्कीच प्राप्त होईल. यासाठी योगाविषयी सतत प्रबोधन, मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. अखिल विश्वातील मानवाने योगसाधना करून योगाचे सामर्थ्य अनुभवावे आणि स्वत:चा उत्कर्ष साधून घ्यावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment