सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे कार्य कौतुकास्पद ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांचा सन्मान करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हरिद्वार – हिंदु जनजागृती समितीसह सनातन संस्थेने ‘धर्म आणि राष्ट्र’विषयक चित्रमय प्रदर्शनाद्वारे धर्माविषयीचे बारकावे सांगितले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे या संघटनांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी काढले. येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी वरील कौतुकोद्गार काढले. या वेळी स्वामी परमात्मानंद गिरि महाराज यांच्यासह शदाणी दरबार तीर्थचे अनेक भक्त उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या संतद्वयींचा पुष्पहार घालून सन्मान केला.

 

पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांचा परिचय

छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधिश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज हे विश्‍व हिंदु परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्च अधिकार समितीचे सदस्य आहेत.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment