काही संत आणि द्रष्टे यांनी पुढील १-२ वर्षांतच तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे मोठी हानी होऊ शकते, असे सांगितले आहे. तेच काही प्रमाणात तज्ञ आता सांगत आहेत. यातून जनतेने स्वतःचे रक्षण करण्यासाठी उपययोजना कराव्यात आणि सरकारनेही त्यांना मार्गदर्शन करावे !
नवी देहली – भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०२० मध्ये भारतात विस्थापित झालेल्यांची संख्या १ कोटी ४० लाख आहे, तर वर्ष २०५० पर्यंत ती साडेचार कोटी होऊ शकते. ‘पर्यावरणाविषयी उदासीनतेची किंमत : विस्थापन आणि स्थलांतराचा त्रास’ या अहवालात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘अॅक्शन एड’ आणि ‘क्लायमॅट अॅक्शन नेटवर्क साऊथ एशिया’ यांनी हा अभ्यास केला आहे.

अतीवृष्टी आणि भूकंप यांमुळे हानी होण्याविषयीचे भाकीत खरे ठरले !
बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !
महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांना जागृत करणे
ईश्वरी नियोजनाप्रमाणे विश्व महायुद्ध होणार असल्याने त्याचा विचार करू नका !
आपत्काळ आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना, यांविषयी विविध संत अन् भविष्यवेत्ते यांनी केलेली भविष्यवाणी
कर्नाटकमधील कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांची भविष्यवाणी !