महिलांनी धर्माचरण करण्यासह स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

पूर्वोत्तर भारतातील महिलांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – कानपूरमध्ये केवळ २१ दिवसांमध्ये ११ ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर आल्या. याचा गांभीर्याने विचार करून महिलांनी संघर्ष करण्याची मानसिकता निर्माण केली पाहिजे. याचसमवेतच महिलांनी कुंकू लावणे, अलंकार घालणे, कुलाचाराचे पालन करणे आदी धर्माचरणाच्या कृती नित्यनेमाने कराव्यात, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे. त्यामुळे आपल्यामध्ये देवीचे शक्तीतत्त्व जागृत होऊन आत्मबळ वाढेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी विजयादशमीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचा लाभ उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल येथील अनेक युवती आणि महिला यांनी घेतला. समितीच्या रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींनी स्वरक्षण प्रात्यक्षिके ‘ऑनलाईन’ सादर केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment