सतीचे ब्रह्मरंध्र ज्या ठिकाणी पडले, ते पाकिस्तानस्थित शक्तिपीठ श्री हिंगलाजमाता !

Article also available in :

मंदिरात प्रतिष्ठापित श्री हिंगलाजमाता

हिंगलाजमाता मंदिर हे ५१ शक्तिपिठांपैकी एक असून ते पाकिस्तानमध्ये आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र (डोके) पडले होते. ते बलुचिस्तानच्या लारी तालुक्यामध्ये एका घनदाट खोर्‍यात आहे. हिंगोल नदीच्या काठावर आणि मकरान वाळवंटाच्या खेरथार टेकड्यांत वसलेले श्री हिंगलाजमाता मंदिर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.

श्री हिंगलाजमातेची स्वयंभू शिळा

श्री हिंगलाजमाता मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे. मंदिरामध्ये एक मातीची वेदी आहे. या मंदिरात देवीची मूर्ती नसून स्वयंभू शिळा आहे. ही शिळा शेंदुराने मढवलेली आहे. त्याला संस्कृतमध्ये ‘हिंगुला’ म्हणतात. त्यापासून कदाचित् श्री हिंगलाजमाता हे नाव मिळाले असावे. या ठिकाणी श्री हिंगलाजदेवीला ‘हिंगुलादेवी’ म्हणूनही संबोधतात. मागील ३ दशकांमध्ये हे मंदिर पुष्कळ लोकप्रिय झाले आहे. देवी डोडिया राजपूतांसाठी प्रथम कुलदेवी म्हणून पूजनीय आहे. या परिसरात हिंगलाजदेवी मंदिराखेरीज इतरही पूजास्थळे आहेत.’

(संदर्भ : संकेतस्थळ)

Leave a Comment