तणावमुक्तीसाठी सनातन संंस्थेच्या वतीने शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

सौ. प्राची जुवेकर

वाराणसी (उत्तरप्रदेश) – कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शिक्षकांवरील कार्यभार वाढला आहे. त्यामुळे त्यांना तणाव, भविष्याची चिंता, निराशा इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. ईश्‍वर त्यांच्या भक्तांचे रक्षण करत असतो. त्यामुळे त्याचे भक्त होण्यासाठी आपल्याला काळानुसार कुलदेवतेचे नामस्मण आणि पूर्वजांचे त्रास दूर करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप केला पाहिजे. या समवेतच आपण मनाला स्वयंसूचना दिल्यास आपले मन लवकर तणावमुक्त होण्यास साहाय्य होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ‘सध्याचा आपत्काळ आणि सुरक्षित अन् आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर शिक्षकांसाठी विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले. त्यामध्ये त्या बोलत होत्या. या व्याख्यानामध्ये बिहार, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश, बंगाल या राज्यांतील अनेक शिक्षक ऑनलाईन सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी शंकानिरसन करण्यात आले.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मेकॉले आणि साम्यवादी यांच्या प्रभावामुळे आज देशात बाबर, हुमायू, अकबर या आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो. ज्या टिपू सुलतानने हिंदूूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची जयंती साजरी केली जाते; परंतु देश आणि धर्म यांसाठी त्याग करणारे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोेपे, मंगल पांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती दिली जात नाही. ही स्थिती पालटण्यासाठी आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांच्यानुसार शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल. यासाठी आपण संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment