आपत्काळाच्या सिद्धतेसाठी नवीन अथवा जुनी बैलगाडी, घोडागाडी किंवा त्यांचे विविध भाग अर्पण अथवा अल्प मूल्यात कुणी देऊ शकत असल्यास त्याविषयी माहिती पाठवा !

साधकांना सूचना, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना विनंती !

सध्या वाहतुकीसाठी रेल्वे, ट्रक, टेम्पो, रिक्शा आदी इंधनावर चालणार्‍या वाहनांचा वापर केला जातो. संभाव्य आपत्काळात इंधन उपलब्ध होऊ शकणार नाही. त्या वेळी दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्राचीन काळी वापरल्या जाणार्‍या इंधनविरहीत वाहनांचा (उदा. बैलगाडी, घोडागाडी) पर्याय निवडावा लागणार आहे. ही सर्व साधने प्राप्त करणे, ती चालवणे, त्यांची देखभाल दुरुस्ती करणे आणि प्राण्यांची देखभाल करणे यांचे कौशल्य आतापासून शिकणे आवश्यक आहे.

१. नवीन बैलगाडी आणि घोडागाडी अर्पण
स्वरूपात अथवा अल्प मूल्यात देऊ शकत असल्यास कळवावे !

येत्या काळात सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे यांच्यासाठी बैलगाड्या आणि घोडागाड्या यांची आवश्यकता भासणार आहे. आजही ग्रामीण क्षेत्रात काही शेतकरी बैलगाड्यांचा वापर करत असल्यामुळे ग्रामीण भागांत या गाड्यांचे उत्पादन केले जाते. आपल्या क्षेत्रातील बैलगाडी किंवा घोडागाडी बनवणार्‍यांची माहिती स्थानिक साधकांना पाठवावी. त्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील रकान्यानुसार माहिती पाठवावी. ‘नवीन गाड्या अर्पण स्वरूपात कि अल्प मूल्यात देऊ शकतात ?’, तेही कळवावे.

 

२. जुनी बैलगाडी आणि घोडागाडी किंवा त्यांचे
भाग अर्पण अथवा अल्प मूल्यात देण्याविषयी माहिती पाठवा !

ग्रामीण भागांतील शेतकर्‍यांनी शेतीसाठी बैलगाड्यांचा वापर अल्प करून वाहनांचा वापर वाढवला आहे. त्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांकडे या बैलगाड्या किंवा त्याचे भाग (चाके, साटी (माल ठेवायची जागा), जू (दोन बैलांना बैलगाडीला जुंपण्यासाठी वापरण्यात येणारे लाकूड) आदी) विनावापर पडून आहेत. या सर्व भागांची थोडी दुरुस्ती करून ते पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत.

आपल्या भागातील शेतकरी अशा प्रकारच्या जुन्या बैलगाड्या आणि घोडागाड्या किंवा त्यांचे भाग अर्पण स्वरूपात किंवा अल्प मूल्यात देण्यास इच्छुक असल्यास त्या संदर्भातील माहिती स्थानिक साधकांना पाठवावी. स्थानिक साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार माहिती कळवावी.

वरील सर्व माहिती खालील संगणकीय पत्त्यावर पाठवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment