आश्रमाचे बांधकाम अथवा नूतनीकरण या सेवांसाठी स्थापत्य अभियंता, वास्तूविषारद, ड्राफ्ट्समन आदींची आवश्यकता !

बांधकाम क्षेत्रातील साधक आणि वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी यांना सत्सेवेची अमूल्य संधी !

सध्या सनातनच्या आश्रमाचे नव्याने बांधकाम अथवा नूतनीकरण (रिनोव्हेशन) करणे चालू आहे. बांधकाम क्षेत्रातील जाणकारांना या सेवेद्वारे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती असणार्‍या आश्रमांच्या पुनर्निर्मितीसाठी हातभार लावण्याची सुवर्णसंधी आहे.

 

१. स्थापत्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक

बांधकामाचे पर्यवेक्षण (साईट सुपरविझन), तसेच R.C.C. डिझाईन करणे, यांसाठी प्रत्यक्ष बांधकामाचा अनुभव असलेले स्थापत्य अभियंता (डिग्री अथवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनीयर), तसेच प्रकल्प व्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजर) यांची आवश्यकता आहे.

 

२. वास्तूविषारद (आर्किटेक्ट)

संगणकावर नकाशा (ड्राईंग) आणि आराखडा (डिझाईन) काढण्याचा अनुभव असलेले वास्तूविषारद हवे आहेत. त्रिमितीय (३ डायमेन्शनल) ‘ग्राफिक्स’ येत असल्यास अधिक उत्तम !

 

३. ड्राफ्ट्समन

‘सिव्हिल ऑटोकॅड’ या संगणकीय प्रणालीवर नकाशा (ड्रॉईंग) काढण्याचा अनुभव असलेले ड्राफ्ट्समन

यासह बांधकामाचा संभाव्य खर्च (इस्टिमेट) काढू शकणार्‍या अभियंत्यांचीही आवश्यकता आहे.

वरील कौशल्य असणारे पूर्णवेळ अथवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून वा घरबसल्या या सेवेत सहभागी होऊ शकतात. सेवेसाठी इच्छुक असलेले साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वतःची माहिती पाठवावी.

 नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment