सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्यादिवशी नवीन वस्त्रे अन् विविध अलंकार धारण करणे

सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी
नवीन वस्त्रे अन् विविध अलंकार धारण केल्याने होणारे लाभ

सण किंवा शुभदिनी प्रातःकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्रे आणि अलंकार धारण करणे या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत; मात्र यामागेही शास्त्र दडलेले असून ते धारण करणार्‍याला त्यातून आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असतो. या लेखातून आपण त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया.

 

नवीन वस्त्रे अन् विविध अलंकार धारण करणे

नवीन वस्त्रे अन् विविध अलंकार धारण करणे

१. देवतांचा आशीर्वाद मिळणे

सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी काही वेळा देवता सूक्ष्मातून भूतलावर येतात. त्या दिवशी वस्त्रालंकाराने सुशोभित होणे, हे त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यासारखेच आहे. त्यामुळे देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि आपल्याला देवतांच्या लहरी ग्रहण करता येतात.

२. देवतांच्या तत्त्वलहरींचा वर्षभर लाभ होणे

सणाच्या दिवशी नवीन किंवा रेशमी वस्त्रे परिधान केल्याने देवतांचे तत्त्व त्या वस्त्रांमध्ये अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट होऊन वस्त्रे सात्त्विक होतात. वस्त्रांत आकृष्ट झालेल्या देवतांच्या तत्त्वलहरी वस्त्रांमध्ये दीर्घकाळ टिकून राहतात आणि ही वस्त्रे वर्षभर परिधान करणार्‍याला देवतांच्या तत्त्वलहरींचा वर्षभर लाभ होतो.

३. देवतांच्या तत्त्वलहरींमुळे देहांची शुद्धी होणे

देवतांच्या तत्त्वलहरी जिवाचा स्थूलदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांकडे अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट झाल्यामुळे त्या देहांची शुद्धी होऊन ते देह सात्त्विक बनतात.

४. वाईट शक्तींपासून रक्षण होणे

‘सण, यज्ञ, मुंज, विवाह, वास्तूशांत यांसारखे धार्मिक विधी या वेळी देवता आणि अनिष्ट शक्ती यांचे सूक्ष्म-युद्ध अनुक्रमे ब्रह्मांड, वायूमंडल अन् वास्तू येथे होत असते. त्यामुळे सण साजरा करणार्‍या आणि धार्मिक विधींच्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या व्यक्ती यांच्यावर या सूक्ष्म-युद्धाचा परिणाम होऊन त्यांना वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो. विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन त्या व्यक्तींची सात्त्विकता वाढते आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून त्यांचे संरक्षण होते. यासाठी सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी अन् शुभदिनी नवीन किंवा रेशमी वस्त्रे आणि विविध अलंकार परिधान करण्याविषयी धर्मशास्त्रात सांगितले आहे.

– ईश्वर ( कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५ ).

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment