सनातन संस्थेचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे प्रस्तावित ‘सौरऊर्जा प्रकल्पां’च्या उभारणीसाठी धनरूपात वा वस्तूरूपात साहाय्य करा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

 

१. आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातनचे भारतभरातील
आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्याचा संस्थेचा मानस !

‘वीज’ हा मानवाच्या आयुष्यातील जीवनावश्यक घटक आहे. आपत्कालीन स्थितीत विजेच्या अभावी सर्वांची गैरसोय होते. अशा वेळी सौरऊर्जेवर चालणार्‍या उपकरणांचा वापर करणे आवश्यक असते. ‘आपत्कालीन स्थिती कधी उद्भवेल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातनचे भारतभरातील आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. उपलब्ध असलेल्या छताचा वापर करून ही यंत्रणा तत्परतेने उभारण्यात येणार आहे.

 

२. सौरऊर्जेचा वापर केल्याने होणारे लाभ

सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, ही एक प्रकारे आयुष्यभराची गुंतवणूकच (‘लाईफ टाईम इन्व्हेस्टमेन्ट’) असते. या ऊर्जेमुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होते. ही यंत्रणा उभारून आपत्काळाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यामुळे संस्थेचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य पुढील काळातही विनाअडथळा चालू राहू शकेल.

 

३. सनातनच्या आश्रमात सौरऊर्जेचा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये
उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे अडीच कोटी रुपये व्यय येईल !

काही हितचिंतकांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करण्याची इच्छा यापूर्वी व्यक्त केली आहे. एकंदरीत सर्वत्रचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथील लहान-मोठ्या प्रस्तावित प्रकल्पांचा विस्तार लक्षात घेता यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १५० ‘किलोवॅट’ क्षमतेपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ‘हायब्रीड’ (बॅटरीवर चालणारा, तसेच सूर्यप्रकाश नसतांना विजेवरही चालणारा प्रकल्प) या प्रकारे उभारण्यात येणार असून त्याचा अंदाजे व्यय (खर्च) दीड कोटी रुपये आहे.

दुसर्‍या टप्प्यात जागेच्या उपलब्धतेनुसार १०० ‘किलोवॅट’ क्षमतेचा प्रकल्प उभारायचा असून त्यासाठी १ कोटी रुपये व्यय येईल. जेवढ्या ‘किलोवॅट’ क्षमतेची यंत्रणा उभारायची असते, तेवढे लक्ष रुपये व्यय येतो. म्हणजेच १ ‘किलोवॅट’ क्षमतेची यंत्रणा उभारण्यासाठी १ लक्ष रुपये खर्च येतो. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील दोन्ही टप्प्यांत उभारावयाच्या ‘सौरऊर्जा प्रकल्पां’साठी आपल्या क्षमतेनुसार धनरूपात साहाय्य करू शकतात.

 

४. ‘सौरऊर्जा प्रकल्पा’साठी सौर उपकरणांचीही आवश्यकता !

हा प्रकल्प उभारण्यासाठी ‘विक्रम’ (Vikram), ‘वारी’ (WAAREE), ‘अदानी’ (Adani), ‘सोलरेज’ (Solaredge), ‘टाटा पॉवर सोलर’ (Tata Power Solar) आदी मान्यताप्राप्त आस्थापनांच्या सौर उपकरणांचीही (‘पॅनल्स’, ‘इन्व्हर्टर’, ‘बॅटरी’, केबल्स इत्यादी) आवश्यकता आहे.

भारतभरातील सौरऊर्जा व्यावसायिक १ ‘किलोवॅट’पासून २५ ‘किलोवॅट’पर्यंत क्षमता असलेल्या स्वतंत्र सौरयंत्रणा आश्रमात विनामूल्य किंवा अल्पमूल्यात स्थापित (‘इन्स्टॉल’) करून देऊन सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात हातभार लावू शकतात.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्यासाठी सौर उपकरणे उपलब्ध करून देऊ शकतात अथवा धनरूपात साहाय्य करू शकतात त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे निःस्वार्थीपणे कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या आश्रमात ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारणी करण्यासाठी कृपया साहाय्य करून या कार्यात यथाशक्ती हातभार लावावा !’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (१३.७.२०२०)

Leave a Comment