यातून ‘हिंदु धर्म किती प्राचीन आहे आणि त्याच्याकडे किती प्रगत ज्ञान होते’, हे लक्षात येते ! आतातरी भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदु धर्मावर श्रद्ध ठेवतील का ? कि आताही त्यांच्या बुद्धीचा किस पाडत रहातील ?
नवी देहली – भारतात ‘कल्प विग्रह’ या नावाने ओळखली जाणारी भगवान शंकराची धातूची मूर्ती आतापर्यंत जगात सापडलेल्या अनेक मूर्तींपैकी सर्वांत प्राचीन मूर्ती समजली जाते. ही मूर्ती एका लाकडी पेटीत ठेवलेली होती. या पेटीवर आणि तिच्या भेगांत साठलेल्या सेंद्रिय गाळावर अमेरिकेतील बर्कली येथील कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ‘कार्बन डेटींग’ प्रक्रिया करून तिचे वयोमान शोधण्यात आले असता, ही मूर्ती २८ सहस्र ४५० वर्ष प्राचीन असल्याचे आढळून आले. म्हणजेच ही मूर्ती कलियुगातील (सध्या कलियुगाचे ५ सहस्र १२२ वे वर्ष चालू आहे) नसून ती द्वापरयुगातील असल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयीची माहिती प्रसिद्ध पुरातत्व तज्ञ के.के. महंमद यांनी ट्वीट करून दिली आहे. ‘२८ सहस्र ४५० वर्षांपूर्वी इजिप्त, ग्रीस, मेसोपोटेमिया, मोहेंजोदारो-हडप्पा संस्कृतीही अस्तित्वात नव्हती’, असे महमंद यांनी यात म्हटले आहे.
के.के. महंमद हे श्रीरामजन्मभूमी उत्खनन करणार्या पथकात सहभागी होते. ‘ही भूमी श्रीरामाचीच जन्मभूमी आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवण्यात के.के. महंमद यांनी दिलेल्या अहवालाचा मोठा वाटा होता.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !