समाजासाठी सनातन संस्थेच्यावतीने ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन

आपत्कालीन परिस्थितीतील संजीवनी असणार्‍या
‘ऑनलाईन’ प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमांना समाजातून उत्तम प्रतिसाद

‘आजच्या काळात प्रत्येकाला प्रथमोपचाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे; पण दुर्दैवाने सध्या आपत्कालीन प्रशिक्षण मिळण्याची व्यवस्था नाही. आगामी आपत्काळात हे प्रथमोपचार संजीवनीच ठरणार आहेत. त्या दृष्टीने. अनेक ठिकाणी १५ दिवसांतून एकदा ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्याला साधक, ‘सनातन प्रभात’चे वाचक,  हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दळणवळण बंदीच्या काळात म्हणजे साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात ४० ठिकाणी ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यात आले. याचा १ सहस्र राष्ट्रप्रेमींनी लाभ घेतला.

 

‘व्हिडिओ’ आणि ‘पीपीटी’ यांच्या माध्यमातून प्रशिक्षण

दळणवळण बंदीमुळे प्रत्यक्ष समोरासमोर प्रथमोपचार शिकवण्यास मर्यादा आहेत; मात्र ही मर्यादा ‘व्हिडिओ’ आणि ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ (पीपीटी) या माध्यमातून ओलांडण्यात आली. जरी हे प्रशिक्षण ‘ऑनलाईन’ असले, तरी प्रशिक्षकांनी ‘व्हिडिओ’ आणि ‘पीपीटी’ या माध्यमांतून हे प्रशिक्षण अधिक सोपे केल्याने सर्वांना विषय सहजतेने समजत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment