प.पू. भक्तराज महाराज यांच्या मोरटक्का (मध्यप्रदेश) येथील आश्रमात सेवेसाठी साधक-दांपत्याची आवश्यकता !

साधक-दांपत्याला सेवेची अनमोल संधी !

मोरटक्का (खेडीघाट), जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश येथील ‘सद्गुरु सेवा सदन’ या प.पू. भक्तराज महाराज यांनी निर्माण केलेल्या आश्रमात विविध सेवांसाठी सेवाभावी वृत्तीच्या साधक-जोडप्याची आवश्यकता आहे. आश्रमात सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत सेवेसाठी येणार्‍या २ स्त्री सेवेकरी आणि १ पुरुष सेवकरी यांच्याकडून महाप्रसाद बनवून घेणे; भांडी घासणे; आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे; आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे, त्यांची देखभाल करणे, असे सेवांचे स्वरूप असेल.

ही सेवा करण्यास इच्छुक असलेल्या साधक-दांपत्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार माहिती कळवावी. अशा साधक-दांपत्यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही आठवडे राहून वरील प्रकारच्या सेवा शिकून घ्याव्यात.

घटक  तपशील
१. नाव आणि पत्ता
२. संपर्क क्रमांक
३. पती-पत्नीचे वय (वर्षे)
४. सेवेसाठी किती दिवस जाऊ शकता ?

 

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

Leave a Comment