भावी पिढीची जडणघडण योग्य प्रकारे होण्यासाठी नवी देहली येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्ग

नवी देहली – येथे सनातन संस्थेेच्या वतीने लहान मुलांसाठी ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते. या ‘ऑनलाईन’ वर्गाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दळणवळण बंदीच्या कालावधीत सनातन संस्थेेच्या साधिका सौ. माला कुमार गेल्या १ मासापासून हा बालसंस्कार वर्ग घेत आहेत. या बालसंस्कार वर्गाला सौ. कुमार यांनी त्यांच्या नातेवाइकांच्या मुलांना जोडण्याचा प्रयत्न केला. या ‘ऑनलाईन’ वर्गाला अमेरिका, दुबई, कोलकाता आणि देहली अशा विविध ठिकाणांहून लहान मुले सहभागी होतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment