‘पिप’ या तंत्रज्ञानप्रणालीद्वारा
सिद्ध झालेले चैतन्याच्या स्तरावरील श्रेष्ठत्व !

‘पिप (पॉली कॉन्ट्रास्ट इंटरफरन्स फोटोग्राफी)’या
तंत्रज्ञानप्रणालीद्वारा सिद्ध झालेले ‘प.पू. डॉक्टरांच्या देवघरात असलेल्या
प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रा’चे चैतन्याच्या स्तरावरील श्रेष्ठत्व !

‘विज्ञानयुगात माणसापेक्षा, संतांपेक्षा यंत्रावर जास्त विश्वास असल्यामुळे ‘सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान
प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांचे’ यंत्राद्वारे केलेले परीक्षण येथे दिले आहे.’ – डॉ. आठवले

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक वस्तूतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. सूक्ष्मातील जाणकार व्यक्ती किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीही यावर उत्तम भाष्य करून नकारात्मक स्पंदने असल्यास त्यावर उपायही सांगू शकतात.

भक्तांची, साधकांची, तसेच संतांना आणि देवतांना मानणार्‍यांची यावर श्रद्धा असते; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक कसोटीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते.

येथेही ‘पिप’, तसेच ‘आर्. एफ्. आय’ रिडिंग या तंत्रज्ञान प्रणालींचा उपयोग करून ‘प.पू. भक्तराज महाराजांचे जिवंतपणा आलेले साठ्यातील छायाचित्र आणि साधकाकडील छायाचित्र’ यांच्या तुलनेत ‘प.पू. भक्तराज महाराजांचे
प.पू. डॉक्टरांच्या देवघरात असलेले छायाचित्र’ यामध्ये सात्त्विकता अधिक आहे’, हे वैज्ञानिक निकषांद्वारा सिद्ध झाले आहे.

‘आर्.एफ्.आय’च्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्विक ऊर्जा मोजू शकतो, तर ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ पाहू शकतो. ‘पिप’ हे एक संगणकीय अद्ययावत सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरला व्हिडिओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे प्रत्येक वस्तूची, वास्तूची, व्यक्तीची ऊर्जावलये पहाता येतात. हे सॉफ्टवेअर रंगांचे विभाजन करते. सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय यात आहे.

शेवटी विज्ञानालाही मर्यादा असल्याने यंत्राद्वारे लावले जाणारे वैज्ञानिक निकष काही टप्प्यांपर्यंत एखाद्या गोष्टीतील स्पंदनांचे निदान लावू शकले, तरी संत, गुरु, सदगुरु हे यंत्राने मोजमापन केलेल्या स्पंदनांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक सूक्ष्म असणार्‍या, म्हणजेच सूक्ष्मातीसूक्ष्म असणार्‍या स्पंदनांना ईश्वरी शक्तीच्या बळावर जाणू शकतात; म्हणून शेवटी प्रत्येकालाच विज्ञानातून अध्यात्माकडे वाटचाल करण्याशिवाय पर्याय नसतो.

‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या बळावर सिद्ध झालेल्या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रातून सुरू असणार्‍या सूक्ष्मातील अलौकीक कार्याचा’ लाभ करून घेण्यासाठी आपण सर्वांनीच साधना वाढवणे आणि लवकरात लवकर श्री गुरूंची कृपा संपादन करणे महत्त्वाचे आहे, तरच या प्रयोगातून सिद्ध झालेल्या प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रातील चैतन्याचा खर्‍या अर्थाने आपण आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेतला, असे होईल. यासाठी श्री गुरूंनी आम्हाला चैतन्यशक्ती द्यावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !

१. प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रांचे ‘आर्. एफ्. आय. (रेझोनन्ट
फिल्ड इमेजिंग) फ्रिक्वेंसी’ या तंत्रज्ञानाद्वारे केलेले संशोधन आणि त्याचे निष्कर्ष

वस्तूची ‘आर्. एफ्. आय. (रेझोनन्ट फिल्ड इमेजिंग) फ्रिक्वेंसी’
नोंद आणि त्यांचे विवरण

प्रयोगापूर्वी केलेली नोंद

नोंदीचे विवरण

प्रत्यक्ष वस्तू ठेवल्यावर केलेली नोंद

नोंदीचे विवरण

१. प.पू. भक्तराज महाराजांचे जिवंतपणा आलेले साठ्यातील छायाचित्र

१२२ (MHz)

या कंपनसंख्येचा रंग भगवा आहे. हा रंग वातावरणात तणाव दर्शक स्पंदने कार्यरत असल्याचे स्पष्ट करणारा आहे

१२४.८ (MHz)

या कंपनसंख्येचा रंग सोनेरी आहे. आध्यात्मिक स्तरावरील उच्च तत्त्व दर्शवणारा आहे.

२. प.पू. भक्तराज महाराजांचे जिवंतपणा बरोबरच मुखमंडल लालसर झालेले साधकाकडील छायाचित्र

१२२ (MHz)

या कंपनसंख्येचा रंग भगवा आहे. हा रंग वातावरणात तणाव दर्शक स्पंदने कार्यरत असल्याचे स्पष्ट करणारा आहे

१२१.८ (MHz)

या कंपनसंख्येचा रंग भगवा आहे हा रंग वातावरणातील रज-तमाशी युद्ध सुरू आहे, हे दर्शवतो, म्हणजेच तो वर्तमानकालीन तणावदर्शक युद्धजन्य परिस्थिती दाखवणारा आहे.

३. प.पू. भक्तराज महाराजांचे जिवंतपणा येण्याबरोबरच मुखमंडल पिवळे होणे, तसेच प्रभावळ विरत चाललेले प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील छायाचित्र

१२२ (MHz)

या कंपनसंख्येचा रंग भगवा आहे. हा रंग वातावरणात तणाव दर्शक स्पंदने कार्यरत असल्याचे स्पष्ट करणारा आहे

१२३.६ (MHz)

या कंपनसंख्येचा रंग भगवा आहे. हा रंग तणावदर्शक युद्धजन्य परिस्थिती दर्शवतो.

– श्री. संतोष शामराव जोशी (वैश्विक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे) (चैत्र कृ. १३, कलियुग वर्ष ५११४ (१९.४.२०१२))

२. प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रांचे‘पिप(पॉली कॉन्ट्रास्ट
इंटरफरेन्स फोटोग्राफी)’या तंत्रज्ञानप्रणालीद्वारा केलेले संशोधन आणि त्याचे निष्कर्ष


टीप १


टीप २


टीप ३

२ अ. प.पू. भक्तराज महाराजांचे साठ्यातील छायाचित्र
जिवंत जाणवणे आणि साधकाकडील अन् प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील
छायाचित्रेही जिवंत जाणवून त्यांच्यात स्थानानुसार आणि काळानुसार झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट

रंग

कशाचे दर्शक?

छायाचित्रांतील प्रभावळीचे वर्णन

कोणाकडील छायाचित्र ?

१. संग्रहातील

(ऑगस्ट २०१० ते जून २०११)
(मूळस्थानी १)

२. साधकाकडील

(सप्टेंबर २०११)

(मूळस्थानी २)

३. प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील

(मार्च २०१२)

(मूळस्थानी ३)

१. हिरवा

सकारात्मक ऊर्जा

छायाचित्राभोवती अधिक

छायाचित्राभोवती आणखी वाढणे

छायाचित्र पूर्ण व्यापून जाणे

२. आकाशी

आध्यात्मिक वैश्विक ऊर्जा

छायाचित्राच्या वरील भागातून बाहेर पडणे

प्रक्षेपणात वाढ होणे

छायाचित्राच्या सर्व बाजूंनी पसरणे

३. पिवळा

आध्यात्मिक उच्च तत्त्व

डोक्याभोवती प्रभावळीची आकृतीरेखा असणे

प्रभावळ भरीव होणे

प्रभावळ वाढणे आणि पसरणे

४. लाल

मारकता

कोटावर अधिक असणे

खांदा, गळा आणि टोपी यांवर अधिक असणे

खांदा आणि टोपी यांवर अधिक गडद होणे

५. गुलाबी

राजसिकता

छायाचित्रापासून दूर ढकलली जाणे

तीव्रता न्यून होणे

अतिशय अल्प होणे

६. भगवा

तणाव (तामसिकता)

छायाचित्रापासून दूर ढकलली जाणे

तीव्रता न्यून होणे

नाहीसा होणे

– श्री. संतोष शामराव जोशी (वैश्विक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे) (चैत्र कृ. १३, कलियुग वर्ष ५११४ (१९.४.२०१२))

३. निष्कर्ष

३ अ. प.पू. डॉक्टरांच्या देवघरात ठेवलेल्या छायाचित्रातून अधिक सत्त्वगुण प्रक्षेपित होणे

‘पिप’ या तंत्रज्ञानाद्वारे प.पू. भक्तराज महाराजांच्या तीन प्रकारच्या छायाचित्रांच्या प्रभावळीचे संशोधन केल्यावर लक्षात आले की, ‘प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील छायाचित्रातून अधिक सत्त्वगुण प्रक्षेपित होत आहे.’

३ आ. प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रात काळानुसार आणि स्थळानुसार पालट झालेले दिसून आले.

३ आ १. स्थळाचे महत्त्व
३. आ १ अ. इतर दोन ठिकाणी असणार्‍या प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रापेक्षा प.पू. डॉक्टरांच्या देवघरात असणार्‍या प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रात अधिक चैतन्य येणे, ही प्रक्रिया प.पू. डॉक्टरांची खोली इतर ठिकाणांपेक्षा अधिक शुद्ध आणि सात्त्विक असण्याचे दर्शक असणे

प.पू. डॉक्टरांच्या देवघरात असलेले छायाचित्र कमाल प्रमाणात सगुण आणि निर्गुण तत्त्व प्रदान करणारे असल्याने या छायाचित्राने इतर दोन छायाचित्रांच्या तुलनेत व्यापक पद्धतीने वाढत जाणार्‍या रंगांच्या प्रभावळी दाखवल्या. संतांच्या सहवासाने पूनित झालेली वास्तू एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी पवित्र बनते. प.पू. डॉक्टरांमधील शुद्ध आणि पवित्रतेचा गंध घेऊन आलेल्या चैतन्याच्या परिस स्पर्शाने प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र जिवंत होण्याबरोबरच या छायाचित्राचे मुखमंडल चैतन्याने पिवळे झाले आहे आणि आतातर त्यांच्या भोवती असणारी पांढर्‍या प्रकाशाची प्रभावळ वातावरणात विरत चालली आहे. यावरून हे छायाचित्र निर्गुणात जात असल्याचेच सिद्ध होत आहे. ‘पिप’ या तंत्रज्ञानानेही नेमके हेच निकष सिद्ध करणारे निष्कर्ष दाखवले.

३ आ १ आ. संत-सहवासातील प्रत्येक वस्तू चैतन्यमय बनणे

संत-महात्म्यांच्या सहवासातील वस्तू, त्यांच्या उपयोगातील कपडे, ते रहात असणारी खोली येथील वातावरण संपूर्णतः चैतन्याने भारीत झालेले असल्याने त्यांच्या सहवासातील प्रत्येक गोष्टच सत्त्वगुणी बनते, हे पिप या तंत्रज्ञानप्रणालीद्वारे परत एकवार सिद्ध झाले.

३ आ १ इ. संत-सहवासाने दुसर्‍या वस्तूतही चैतन्य प्रक्षेपणाचे गुणधर्म येतात आणि त्या अनुषंगाने त्या त्या गोष्टीत स्थळानुसार पालट दिसून येतात, हेही येथे लक्षात येते.

३ आ २. काळाचे महत्त्व आणि त्यानुसार छायाचित्रात होत गेलेले पालट
३ आ २ अ. आपत्कालाची तीव्रता वाढत चालली आहे, तसा उच्च स्तराचा पालट प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रातही होत असल्याचे ‘पिप’ या प्रणालीने दाखवून देणे

आता आपत्कालाची तीव्रता वाढत आहे. काळ जसा पुढे पुढे सरकत आहे, तशी प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रातून होणार्‍या चैतन्याच्या प्रक्षेपणातही वाढ होत आहे. प.पू. डॉक्टरांच्या देवघरात असणार्‍या प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रात आता काळानुसार खूपच पालट झालेले दिसून येत आहेत. या छायाचित्राचा चैतन्याच्या प्रक्षेपणातील उच्च स्तर ‘पिप’ या तंत्रज्ञानप्रणालीद्वाराही सिद्ध झाला आहे.

४. प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीचे महत्त्व
‘वैज्ञानिक सिद्धांत आणि अध्यात्मशास्त्र’ यांद्वारे मानवजातीला विषद करून सांगणे

प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार सुरू असणारे सनातनचे कार्य हे प्रत्येक गोष्टीचे महत्त्व विज्ञानाद्वारे, तसेच अध्यात्मशास्त्रद्वारेही पटवून देत असते. अनेक घटनांचे, वस्तूंचे परीक्षण करून प.पू. डॉक्टरांनी स्वतः वेळोवेळी त्या त्या वस्तूंचे महत्त्व आणि ज्ञान अध्यात्मशास्त्रद्वारा दिल्या जाणार्‍या सूक्ष्म-ज्ञानाच्या साहाय्याने समाजाला स्पष्ट करून सांगितले आहे आणि आता ‘पिप’ या वैज्ञानिक प्रणालीचा उपयोग करून विज्ञानद्वाराही या वस्तूंचे श्रेष्ठत्व बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विषद करून सांगण्याचा येथे प्रयोगाद्वारा प्रयत्न केला आहे.

५. प्रार्थना !

‘या प्रयोगातून सिद्ध झालेल्या प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यस्वरूप अलौकीक अशा आध्यात्मिक स्तरावरील कल्याणकारी कार्याचे महत्त्व सार्‍या समाजाला कळून अधिकाधिक जीव साधनेला लागोत’, हिच श्री गुरुचरणी तळमळीची प्रार्थना !

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (११.४.२०१२)

Leave a Comment