दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांच्या अतीवापराने डोळ्यांच्या समस्यांत वाढ

काळजी घेण्याचे नेत्ररोग तज्ञांचे आवाहन

संभाजीनगर – दळणवळण बंदीच्या काळात घरी बसून दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांचावापर करणार्‍यांची संख्या वाढली आहे; मात्र यामुळे लहान मुलांसह अनेकांना डोळ्यांचे त्रास होत आहेत. डोळे लाल होणे, त्यातून पाणी येणे, डोळे कोरडे होणे, डोळे दुखणे या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नेत्ररोग तज्ञांनी केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment