विश्वविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस आणि संतांद्वारे सांगितलेले भविष्य

भारत देवभूमी आहे, ऋषींची भूमी आहे. येथे अनेक तपस्वींनी ‘येणारा काळ हा भीषण आपत्तीचा काळ आहे’, असे सांगून आम्हाला पूर्वकल्पना दिली आहे; परंतु आम्ही संकुचित आणि स्वार्थी झालो आहोत. ‘आपले स्वतःचे घर तर सुरक्षित आहे ना’, असा विचार करून आम्ही संत आणि महापुरुष यांच्या वाणीकडे दुर्लक्ष केले. या भविष्यवाणीकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. काही निवडक भविष्यवाणी आपल्यासमोर मांडतोे.

 

१. युगद्रष्टा नॉस्ट्राडेमस

आजपासून ४०० वर्षांपूर्वी नॉस्ट्राडेमस नावाच्या प्रसिद्ध युगद्रष्ट्याचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. त्याने अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या पूर्णतः सत्य सिद्ध झाल्या आहेत. त्याने पहिले आणि दुसरे महायुद्ध यांच्याविषयी जे काही म्हटले होते, ते सर्व सत्य निघाले. त्याने तिसर्‍या महायुद्धाविषयी म्हटले आहे, ‘हे तिसरे महायुद्ध इतके भयानक असेल की, त्यापुढे पहिली २ महायुद्धे म्हणजे अक्षरशः लहान मुलांच्या खेळासारखी वाटतील !’ त्याच्या पुढे तो म्हणतो, ‘तेल उत्पादक राष्टे्र थरथरतील, ज्वालामुखी जागृत (सक्रीय) होतील, अनेक विमानांचा अपघात होईल, तापमान इतके वाढेल की, पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळेल. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, जमीन पाण्यात बुडेल. पाण्यावर एवढी प्रेते तरंगतील की, समुद्राचे पाणी लाल रंगाच्या चिखलासारखे दिसेल.’

 

 २. संत

२.अ. प.पू. गगनगिरी महाराज : प.पू. गगनगिरी महाराजांनी म्हटले होते, ‘पुढे एवढा वाईट काळ येणार आहे की, आम्हा संतांनाही वाटेल, ‘आता लवकर मरण आले, तर अधिक चांगले झाले असते.’ अन्य अनेक संतांनीही अशाच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

२ आ. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले : तिसरे विश्‍वयुद्ध महाभयानक होईल. यामध्ये भारत ओढला  जाईल. परमाणू बॉम्बने होणारा संहार भीषण असेल. गावेच्या गावे उजाडतील. तिसर्‍या विश्‍वयुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. त्यासाठी अनेक संतांची आवश्यकता असेल. त्यासाठी साधकांनी साधना वाढवली पाहिजे.

२ इ. कर्नाटकमधील पू. भगवान महाराज यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ यांनी वर्ष २०१२ आणि वर्ष २०१९ मध्ये सांगितलेले भाकित

१. सुनामी येईल, चक्रीवादळ आणि भूकंप येईल. जग जळून खाक होईल.

२. भारतावरही संकट येईल. आतंकवादी मोठा घातपात करतील. नरसंहार होईल. दिवसाढवळ्या चोर्‍या होतील आणि लुटालूट होईल. महाराष्ट्राच्या कृष्णा नदीच्या काठी ९ लक्ष बांगड्या फुटतील.

३. नद्या आटतील. पेलाभर पाणीही विकत घ्यावे लागेल. (भावार्थ : पाणी महाग होईल आणि महागाईही पुष्कळ होईल.)

४. औषधे मिळणार नाहीत. रोग-व्याधी वाढतील. डॉक्टर नाईलाजाने हात वर करतील. चालता – बोलता मनुष्याचे प्राण जातील.

२ ई. बाबा वंगानेही केली महायुद्धाची भविष्यवाणी

नॉस्ट्रेडॅमस यांच्याप्रमाणे बल्गेरिया देशातील बाबा वंगा हिनेही महायुद्धाची भविष्यवाणी केली. बुल्गारियाची नेत्रहीन महिला भविष्यवेत्ता बाबा वंगा हिने युरोपमध्ये मुसलमान-ख्रिस्ती संघर्षाविषयी स्पष्ट स्वरूपात भविष्यवाणी केली. तिने सांगितले, ‘‘जगभरात ग्रेट मुसलमान युद्धा’ला प्रारंभ होईल. ही लढाई अरबच्या भूमीपासून चालू होईल. त्यानंतर सिरीया आणि नंतर युरोपमध्ये लढली जाईल अन् ती वर्ष २०४३ पर्यंत चालेल.’’ बाबा वंगाचे वर्ष १९९६ मध्ये ८५ व्या वर्षी निधन झाले. तिने अमेरिकेवर झालेल्या ९/११ चे आक्रमण आणि वर्ष २००४ मध्ये आलेली ‘त्सुनामी’ या घटनांची अनेक वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती.

 

भारताच्या उज्ज्वल भवितव्याविषयी भविष्यवेत्त्यांनी सांगितलेले संकेत

अ. ‘सागराचे नाव असणारा धर्म चंद्रावर निर्भर रहाणार्‍यांच्या तुलनेत जलदगतीने वाढेल आणि त्याला भयभीत करेल’ – नॉस्ट्रेडॅमस

आ. ‘लालच्या विरोधात लोक संघटित होतील; परंतु षड्यंत्र आणि धोका यांना निष्फळ करण्यात येईल.

इ. ‘पूर्वेचा तो नेता त्याचा देश सोडून येईल आणि इटलीच्या टेकड्या अन् फ्रान्स यांना पाहील. तो वायू, जल आणि बर्फ यांहून वर जाऊन सर्वांवर त्याच्या दंडाने प्रहार करेल.’

(संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ)

 

 

आपत्काळ ओढवण्यामागील कारण

अतिवृष्टिः अनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥
– कौशिकपद्धति

अर्थ : (राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे)अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.

तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

सध्याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्यावर अनेक संकटे ओढवली आहेत. एकेका संकटाचा प्रतिकार करण्यापेक्षा संपूर्ण समाजाला नीतीमान बनवणारे, म्हणजे सर्व संकटांचा समूळ नाश करणारे आणि विश्‍वकल्याणाचे ध्येय बाळगणारे धर्माधिष्ठित ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे. यासाठी सर्वांनी धर्मपालक आणि नीतीमान राज्यकर्त्यांनाच निवडून दिले पाहिजे.

Leave a Comment