कोरोनापासून रक्षण होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आयुष मंत्रालयाचे आवाहन

पणजी – केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून ‘कोविड १९’चा संसर्ग होऊ नये; म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, ‘‘आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे पालन केल्यास ‘कोविड १९’ सह अन्य संसर्ग होऊ शकत नाही. या सगळ्यांचे मूळ रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात आहे. प्रत्येकाने सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश (मधुमेह असलेल्यांनी साखरविरहित वापरणे) सेवन करावे. दिवसभर जमेल तेवढे गरम पाणी प्यावे. तुळशी, दालचिनी, काळी मिरी, सुंंठ आणि मनुका घातलेला ‘हर्बल’ चहा दिवसातून एकदा प्यावी. ग्लासभर गरम दुधात अर्धा चमचा हळद पूड घालून ते प्यावे.’’

 

हे करू नका !

  • दुपारी झोपू नका, त्यामुळे शरीरातील दोष वाढतात आणि पटकन इन्फेक्शन होते.
  • नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका.
  • अतिरेक टाळा.

 

हे करा !

 

  • वाचन, संगीत आदींचा छंद जोपासा.
  • मन प्रसन्न ठेवा.
  • धूप, वेखंड, मोहरी, कापूर, तेल, गोवरी, राळ, गुगुळ, निबांची पाने आदींपैकी जे मिळेल, ते तव्यावर गरम करा किंवा जाळा. झालेला धूर संपूर्ण घरात फिरवा.
  • बाहेरून घरात येताच हातपाय धुवा. स्वच्छता ठेवा.

 

काळजी घ्या- काळजी करू नका !

‘चुकीचा आहार-विहार, जीवनशैली, धावपळ आदींमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती अत्यल्प झाली आहे. येणार्‍या संकटातून बाहेर पडण्यासाठी आयुर्वेदानुकूल जीवनशैलीचा नक्कीच लाभ होणार आहे. विश्‍वनिर्मात्याच्या आशीर्वादाने आपण या संकटातून बाहेर पडू आणि भारत पुन्हा महासत्तेकडे घोडदौड करेल. काळजी घ्या; पण काळजी करू नका’, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment