तेल किंवा तूप यांचे दिवे लावल्याने वातावरण रोगमुक्त होते ! – तज्ञांचा निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज
रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे, ‘फ्लॅश लाईट’ किंवा विजेरी लावा !

तेलाचा आणि त्यातही तुपाचा दिवा लावल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर होणारे लाभ हिंदु धर्मशास्त्रात फार आधीपासून सांगितले आहेत. विज्ञानाला ते आता कळत आहे. यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोनाविषयी लढतांना आपण एकटे नसून संघटित आहोत’, हे दाखवण्यासाठी उद्या, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून घराच्या दाराबाहेर किंवा सज्जेमध्ये तेलाचे, तुपाचे दिवे किंवा विजेरी अथवा भ्रमणभाषची ‘फ्लॅश लाईट’ लावण्याचे आवाहन केले आहे. तेल किंवा तूप यांचे दिवे लावण्याच्या संदर्भात तज्ञांनी याचे महत्त्व विशद केले आहे.

१. ‘तेल किंवा तूप यांचा दिवा लावल्याने वातावरण स्वच्छ, रोगमुक्त  होते आणि वातावरणात हलकेपणा येतो’, असे भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांमधील तज्ञांनी म्हटले आहे.

२. आय.आय.टी. कानपूरचे प्रा. अनिमांगशू घटक यांनी सांगितले की, मोहरीच्या तेलामध्ये मॅग्नेशियम्, ट्रायग्लिसरायड आणि ‘एलायल आयसो थायोसायनेट’ असते. एलायल पेटल्याने किटक त्याच्या दिशेने आकृष्ट होतात आणि जळून जातात. तेलातील मॅग्नेशियम हवेतील सल्फर आणि कार्बन यांच्या ऑक्साईडसमवेत संयोग करून सल्फेट अन् कार्बोनेट बनवतो. हे विषारी घटक नंतर भूमीवर पडतात. यामुळेच दिव्याच्या जवळ नेहमीच पांढरी राख पडलेली आढळून येते. हे विषारी घटक नष्ट झाल्याने हवा हलकी होते आणि श्‍वास घेण्यास सोपे जाते.

३. तुपाचा दिवा लावल्यानेही असाच प्रकार आढळून येतो. देशी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपामुळे रोग पसरवणारे विषाणू नष्ट होतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, वातावरण स्वच्छ आणि उत्साही झाल्याने प्रतिकारक्षमता चांगली होते आणि व्यक्ती निरोगी रहाते.

४. एच्.बी.टी.यू. कानपूरचे प्रा. आर्.के. त्रिवेदी यांनी सांगितले की, दिवा लावल्याने आर्द्रता वाढते. मोठ्या संख्येने दिवे लागल्यावर तापमान वाढते. दोन्ही स्थिती विषाणूंशी लढण्यासाठी चांगल्या आहेत. मार्च आणि एप्रिल मासांमधील तापमान ऑक्टोबर मासातील तापमानाप्रमाणे असते. या काळात हवा जड असते. त्या वेळी दिवे लावल्याने हवा हलकी आणि स्वच्छ होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या विनंतीच्या संदर्भात ईश्‍वरी ज्ञानातून कळलेली सूक्ष्म स्तरावरील सूत्रे जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment