सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक ! – सौ. संपदा पाटणकर, सनातन संस्था

सौ. संपदा पाटणकर, सनातन संस्था

सांगली – सुख-दुःखात साथ देणारी संस्कृती एकत्र कुटुंबपद्धतीतून निर्माण होते. सण, व्रते आणि उत्सव यांचे एकत्र कुटुंबपद्धतीतून सुसूत्रीकरण होते, तसेच धार्मिक अन् सामाजिक बांधिलकी निर्माण होते. त्यामुळे सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक आहे, असे प्रबोधन सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा अमित पाटणकर यांनी केले. त्या श्री विश्‍वकर्मा सुवर्णकार समाज, सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कौटुंबिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. हा कार्यक्रम श्री गणपति मंदिरामागे असलेल्या कृष्णा लॉन (माई घाट) मध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी १५० जण उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment