हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाने साधना करून स्वतःमधील आध्यात्मिक बळ वाढवावे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दोन दिवसीय ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’

पू. रमानंद गौडा

बेंगळुरू – हिंदु राष्ट्र म्हणजे सकारात्मकता. त्यासाठी शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक पातळीवरील प्रयत्नांपेक्षा आध्यात्मिक पातळीवरील प्रयत्नांची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येकाने साधना करून स्वतःमधील आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे. हिंदु राष्ट्र ही संकल्पना पूर्ण जगासाठी असून त्याचा आरंभ भारतातून होईल. भविष्यकाळात येणार्‍या आपत्काळाला तोंड देण्यासाठी आध्यात्मिक बळ वाढवून सज्ज होऊया, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कामाक्षीपालया भागातील धनंजय पॅलेस येथे कर्नाटकच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठांसाठी १८ आणि १९ जानेवारी असे दोन दिवस ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ घेण्यात आले. या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता विवेक रेड्डी, अधिवक्ता एन्.पी. अमृतेश आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते. या अधिवेशनासाठी अधिवक्ते, विविध हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, मंदिरांचे विश्‍वस्त आणि हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या अधिवेशनात हिंदु धर्माची होणारी हानी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करावयाचे प्रयत्न या विषयांचे अवलोकन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment