मंगळुरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्रासाठी सुसंस्कृत पिढी घडवणारे युवा साधक शिबिर !

शिबिरात सहभागी झालेले युवा साधक

मंगळुरू – आजची युवा पिढी सुसंस्कृत व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये साधनेचा पाया निर्माण व्हावा आणि ते हिंदु राष्ट्रातील आदर्श साधक बनावेत यांसाठी मंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने युवा साधकांसाठी ३ ते ५ जानेवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतील ४५ युवा साधक सहभागी झाले होते.

या शिबिराला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्थिती लाभली. शिबिरात ‘जीवनातील साधनेचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व आणि त्यांचे निर्मूलन कसे करावे ?, स्वतःमधील कौशल्यांची वृद्धी कशी करावी ?’ यासोबतच राष्ट्र-धर्मविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

पू. रमानंद गौडा यांनी ‘शिक्षण घेत असतांना त्याला साधनेची जोड कशी द्यावी आणि त्यामुळे आपण स्वतःमध्ये कसे योग्य संस्कार निर्माण करू शकतो ?,राष्ट्र आणि धर्म याविषयी प्रेम कसे निर्माण होते ?’ यांविषयी उदाहरणासह मार्गदर्शन केले. यामुळे शिबिरातील युवा साधकांना ‘आपण साधना का करायला हवी’, याविषयी जाणीव होऊन त्यांचे साधना करण्याचे ध्येय निश्‍चित झाले. ‘आतापर्यंत आपला वेळ वाया गेला’, असे युवा साधकांना वाटले आणि ‘यापुढे वेळ वाया घालवणार नाही’, असे त्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment