स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

डोंबिवली – कलियुगात स्वभावदोष निर्मूलन केल्याविना आनंदी जीवन जगणे अशक्य आहे. दोष घालवून गुण वाढवणे ही स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आहे. राग येणे, मोठ्याने बोलणे, ऐकून न घेणे, आळस, अव्यवस्थितपणा, ताण येणे हे अहं आणि स्वभावदोष यांचे पैलू आहेत. व्यवहारात ‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हणतात; परंतु स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे हे स्वभावात पालट करण्यावरील औषध आहे. या प्रक्रियेत संतांची संकल्पशक्ती आहे. याचा आपण लाभ करून घेऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेद्वारे आयोजित येथील अहल्याबाई होळकर शाळेतील साधना शिबिरात सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment