राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट

डावीकडून श्री. मनोज दीक्षित, श्री. नारायण प्रसाद पांडेय, श्री. धर्मेंद्र शुक्ला, महंत गोस्वामी अनुराग, श्री. अविनाश तिवारी आणि दैनिक सनातन प्रभातच्या कार्याची माहिती सांगतांना श्री. नीलेश चितळे

रामनाथी (गोवा) – उत्तरप्रदेशमधील राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी अणि कार्यकर्ते यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १८ डिसेंबर या दिवशी भेट दिली. यामध्ये राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत गोस्वामी अनुराग, वाहिनीच्या गौ विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धर्मेंद्र शुक्ल, वाहिनीचे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष श्री. मनोज दीक्षित, गोवा राज्य अध्यक्ष श्री. अविनाश तिवारी आणि गोवा प्रदेश प्रभारी श्री. नारायण प्रसाद पांडेय यांचा समावेश होता. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. नीलेश चितळे यांनी सर्वांना सनातन आश्रमात चालणार्‍या राष्ट्र-धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती अवगत करून दिली. या प्रसंगी महंत गोस्वामी अनुराग यांचा सन्मान सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केला. या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी उपस्थितांशी राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्यस्थितीविषयी चर्चा केली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र-धर्मविषयक कार्याची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ते पाहून त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘अशा कार्याची आज आवश्यकता आहे’, असे सांगितले.

 

सनातन आश्रमाविषयी अभिप्राय

१. महंत गोस्वामी अनुराग

सनातनचा आश्रम अतुलनीय, सात्त्विक, अद्भुत आणि धार्मिक शांती देणारा आहे. आश्रमात हिंदु शुचितेची आणि सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवितेची जाणीव होते.

२. नारायण प्रसाद पांडेय

सनातन संस्थेकडून हिंदु धर्म आणि संस्कृती यांना विज्ञानाच्या परिभाषेत अन् प्रामाणिकपणे प्रसार करण्याचे जे कार्य केले जात आहे, हे स्पृहणीय आहे. संस्थेचे असे आश्रम देशातील प्रत्येक प्रांतात असणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment