मद्याच्या एका घोटानेही कर्करोगाला निमंत्रण ! – संशोधनाचा निष्कर्ष

या संशोधनानंतर भारत सरकारने जनहित लक्षात घेऊन भारतात संपूर्ण मद्यबंदी करावी, ही अपेक्षा !

टोकियो (जपान) – जर आपल्याला वाटले, ‘दिवसाला मद्याचे एक-दोन घोट काही हानी पोचवणार नाहीत’, तर हा विचार चुकीचा आहे. जपानमधील संशोधकांना असे आढळले आहे की, अगदी अल्प प्रमाणातही मद्य प्यायल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. प्रतिदिन १० वर्षे एक घोट किंवा ५ वर्षांसाठी प्रतिदिन २ घोट घेतल्यास कर्करोगाचा धोका ५ टक्क्यांनी वाढेल, असे निष्कर्षांनी स्पष्ट केले आहे.

१. ‘कॅन्सर’ (कर्करोग) या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार एकूणच कर्करोगाचा धोका मद्याच्या शून्य सेवनाने न्यून होत असल्याचे दिसून आले. मद्यप्राशनामुळे मनुष्यदेहावर होणारे दुष्परिणाम आणि कोणत्या प्रकारचा कर्करोग उद्भवू शकतो, याविषयी या पत्रिकेमध्ये प्रकाश पाडण्यात आला आहे.

२. संशोधक पथकाने कर्करोगाने ग्रस्त ६३ सहस्र २३२ रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्या सर्वांचे लिंग, वय, रुग्णालयात भरती होण्याचा दिनांक आदी विविध सूत्रांचा सखोल अभ्यास केला. जपानमधील ३३ सामान्य रुग्णालयांतून ही माहिती गोळा करण्यात आली. सर्व रुग्णांकडून ते मद्य घेत असल्याची सरासरी मात्रा आणि मद्यपानाचा कालावधी यांची नोंद घेण्यात आली. त्यातून केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment