काळाचौकी (मुंबई) येथे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन

विषय ऐकतांना शिबिरार्थी

काळाचौकी – सनातन संस्थेच्या वतीने ‘अभ्युदयनगर येथील एस्.एस्.एम्. शिवाजी विद्यालयामध्ये ७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४.३० ते सायंकाळी ७ या वेळेत ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर घेण्यात आले. जीवनात साधना करणे का आवश्यक आहे ? तसेच जीवनात गुरु असणे का महत्त्वाचे आहे ? आता काळानुसार योग्य साधना कोणती ? या विषयावर सनातन संस्थेचे श्री. भरत कडूकर यांनी मार्गदर्शन केले. जीवनात सुखाचे प्रसंग अल्प आणि दुःखाचे प्रसंगच अधिक येतात. अशा वेळी संतुलित कसे राहायचे ? ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व’ याविषयी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी मार्गदर्शन केले.

सर्वांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया पुष्कळ आवडली. स्वतःमध्ये किती दोष आहेत, याची जाणीव झाल्याचे बर्‍याच जणांनी सांगितले, तसेच हा कार्यक्रम पुन्हा घेण्यास सुचवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment