भांडुप आणि मुलुंड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर

भांडुप

भांडुप येथील शिबिरात विषय ऐकतांना शिबिरार्थी

मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने भांडुप (पूर्व) येथील अवी क्लासेस येथे आणि मुलुंड येथील रिचमंड इंटरनॅशनल प्रिस्कूलमध्ये १ डिसेंबर या दिवशी ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर घेण्यात आले. भांडुप येथे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, श्री. राहुल पाटेकर यांनी, तर मुलुंड येथे सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) ममता देसाई, भरत कडूकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ‘आपल्या स्वभावातील दोष दूर झाले, तर आपण साधनेत लवकर पुढे जातो, तसेच जीवन आनंदी होते’ याविषयी सोप्या भाषेत विश्‍लेषण करण्यात आले.

 

मुलुंड

मुलुंड येथे मार्गदर्शन करतांना डॉ. (सौ.) ममता देसाई

वैशिष्ट्यपूर्ण

१. मार्गदर्शनातून अनेक गोष्टी लक्षात आल्या, तसेच कंटाळा आला नाही, असे सर्वांनी सांगितले.

२. शिबिर चर्चात्मक होऊन त्यात सर्वांनी सहभाग घेतला.

३. अनेकजण विवाह, तसेच अन्य वैयक्तिक कार्याक्रमांहून थेट शिबिराला आले.

४. ‘सनातन संस्थेचे कार्य नि:स्वार्थी आहे’, असे सनातन प्रभात नियतकालिकाचे वाचक श्री. चरणसिंग पवार यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment