सनातन संस्थेचे धर्मरक्षण आणि समाजहित यांचे कार्य अतुलनीय ! – भगतसिंह वीरकर, नगराध्यक्ष (म्हसवड)

ग्रंथ प्रदर्शन पाहतांना भगतसिंह वीरकर आणि अन्य लोकप्रतिनिधी अन् त्यांना माहिती सांगतांना सौ. सुनीता दीक्षित

म्हसवड (जिल्हा सातारा) – धर्मरक्षण आणि तणावमुक्त जीवन यांसाठी सनातन संस्थेचे ग्रंथ उपयुक्त आहेत. संस्थेचे धार्मिक साहित्यही समाजाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. त्यामुळे सनातन संस्थेचे धर्मरक्षण आणि समाजहित यांचे कार्य अतुलनीय आहे, असे मत म्हसवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर यांनी व्यक्त केले. २१ नोव्हेंबर या दिवशी येथील महात्मा फुले चौक येथे सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाचे पूजन नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी नगरसेवक गणेश रसाळ, युवराज सूर्यवंशी, पत्रकार विजयराव टाकणे, नागनाथ डोंबे, सुभाष वीरकर आदी उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुनीता दीक्षित यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment