कन्नूर (केरळ) येथील ‘कृष्णा ज्वेल्स’आणि ‘कृष्णा बीच रिसॉर्ट’ यांचे संचालक प्रमोद कुमार यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

डावीकडून श्री. प्रेमराज आणि श्री. प्रमोद कुमार यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना श्री. अभिषेक पै

रामनाथी, गोवा – कन्नूर (केरळ) येथील ‘कृष्णा ज्वेल्स’ आणि ‘कृष्णा बीच रिसॉर्ट’ यांचे संचालक श्री. प्रमोद कुमार यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. अभिषेक पै यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. येथील वास्तव्यात श्री. प्रमोद कुमार यांनी आश्रमातील ग्रंथ मुखपृष्ठ निर्मिती कक्ष, सनातन संस्थेचा दृकश्राव्य विभाग, सनातन प्रभात नियतकालिके आदींविषयी जिज्ञासेने जाणून घेतले. या वेळी त्यांच्या समवेत ‘कृष्णा ज्वेल्स’चे व्यवस्थापक श्री. प्रेमराज उपस्थित होते.

क्षणचित्र

श्री. प्रमोद कुमार यांनी त्यांच्यासमवेत अलंकारांचे काही नुमने आणले होते. हे नमुने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांना दाखवून ते त्यांचे मार्गदर्शन घेणार आहेत, तसेच साधकांनी सांगितल्याप्रमाणे त्यात पालट करण्याची सिद्धताही त्यांनी दर्शवली आहे. विश्‍वविद्यालयाकडून अलंकारांच्या सात्त्विकतेविषयी करण्यात येत असलेल्या संशोधनामध्ये श्री. प्रमोद कुमार यांनी जिज्ञासा दाखवली आहे.

 

सात्त्विक अलंकारांविषयी जिज्ञासा असणारे श्री. प्रमोद कुमार !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने अलंकाराशी संबंधित असलेल्या प्रथितयश ‘द आर्ट ऑफ ज्वेलरी’ या मासिकामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक अलंकारांविषयी लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचून त्यांच्या मनात आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक अलंकारांविषयी जिज्ञासा निर्माण झाली. याविषयी एक स्वतंत्र दालन असावे, असे त्यांना वाटले. त्या अनुषंगाने ‘सात्त्विक अलंकार (ज्वेलरी) कसे बनवायचे ?’, या संदर्भात जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी ही भेट दिली. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे कार्य पाहून त्यांना अतिशय चांगले वाटले. तरुण वयातही साधकांची पूर्णवेळ साधना करण्याची सिद्धता पाहून ते भारावून गेले. त्यांनी साधकांचे कौतुकही केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment